विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला आहे. तसेच हा सामना सुरू असताना इंग्लंडचा कर्णधार जो रुट आणि डोम सिबले यांच्यात धडक झाल्याचे पाहायला मिळाले होते, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या सामन्यात शेवटच्या डावात अर्थात पाचव्या दिवशी इंग्लंड संघाला विजय मिळवण्यासाठी २७३ धावांची आवश्यकता होती. पाचव्या दिवसाचा खेळ सुरू असताना झॅक क्राउले बाद झाल्यानंतर कर्णधार जो रूट मैदानात आला होता. त्याला लॉर्ड्सच्या या खेळपट्टीवर धावा करणे कठीण जात होते. लक्ष्य मोठे असल्यामुळे कर्णधार जो रूटने एक-एक धाव जोडत धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी नॉन स्ट्राईकवर असलेला डोम सिबलेही त्याला यशस्वी साथ देत होता.
अशातच कर्णधार जो रूटने लेग साईडच्या दिशेने शॉट खेळला आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला. तर नॉन स्ट्राईकला असलेला डोम सिबले रूटकडे न पाहता चेंडूकडे पाहून धावत होता. तसेच जो रूट देखील चेंडूकडे पाहूनच धावत होता. त्यामुळे दोघांनीही एकमेकांकडे पाहिले नाही. परिणामी, दोघांमध्येही धडक झाली आणि जो रूट खाली पडला. परंतु धाव पूर्ण करणेही तितकेच महत्त्वाचे होते. त्यामुळे डोम सिबलेने धावा पूर्ण केली आणि जो रूटही उठून पळत सुटला. त्यानंतर दोघांनाही हसू अनावर झाले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
There's a reason he's called The Fridge 😂 pic.twitter.com/MrAPLg1iAE
— England Cricket (@englandcricket) June 7, 2021
या सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना ३७८ धावा केल्या होत्या. यामध्ये डेवोन कॉनवेने महत्वाची भूमिका बजावली होती. कॉनवेचा पदार्पणाचा सामना असून त्याने या सामन्यात २०० धावांची विक्रमी खेळी केली होती. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाला अवघ्या २७५ धावा करण्यात यश आले होते. इंग्लंड संघाकडून रॉरी बर्न्स याने सर्वाधिक १३२ धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने १६ चौकार आणि १ षटकार लगावला होता.
त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाने ६ बाद १६९ धावा करत डाव घोषित केला होता. इंग्लंड संघाला विजयासाठी २७३ धावा करायचा होत्या. परंतु इंग्लंड संघाने दिवसाखेर ३ बाद १७० धावा केल्या आणि सामना अनिर्णीत ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-
जवळपास ठरलं! १२७च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करणारा ‘हा’ भारतीय श्रीलंका दौऱ्यावर करणार नेतृत्त्व
मांजरेकरांसोबतच्या पर्सनल चॅटिंगचे मेसेज फॅनकडून व्हायरल, पाहा काय म्हणालेत मांजरेकर जडेजाबद्दल