इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (ENGvsNZ) यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेमध्ये कसोटी चॅम्पियन संघाला व्हाईटवॉश मिळाला आहे. घरच्या मैदानावर इंग्लंडच्या संघाने बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली अप्रतिम कामगिरी केली आहे. न्यूझीलंडने ही मालिका जरी गमावली असली तरी डॅरिल मिचेल ( Daryl Mitchell) याने झंझावाती खेळी करत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने या मालिकेत धावांचा रतीब घातला आहे. यावेळी त्याने सर डॉन ब्रॅडमन (Don Bradman) यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
मिचेलने तीन सामन्यांत १०७.६०च्या सरासरीने ५३८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने तीन शतकेही झळकावली आहेत. त्याने लॉर्ड्स कसोटी सामन्यात १०८ धावा केल्या होत्या. त्यानंतर ट्रेंट ब्रीज, नॉटींघम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात १९० आणि हेंडिग्ले, लीड्स येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीमध्ये १०९ धावा केल्या आहेत. तिन्ही सामन्यात शतक केल्यावर त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. तो दुसरा परदेशी फलंदाजी बनला आहे ज्याने इंग्लंडमध्ये खेळलेल्या पहिल्या तीन कसोटी सामन्यांत शतके झळकावली. अशी कामगिरी १९३०मध्ये ब्रॅडमन यांनी केली होती. तब्बल ९२ वर्षानंतर त्यांच्या या विक्रमाची बरोबरी न्यूझीलंडच्या फलंदाजाने केली आहे.
या मालिकेत मिचेल सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. तो इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या न्यूझीलंडच्या खेळाडूमध्ये प्रथम क्रमांकावर आला आहे.
A Daryl Mitchell masterclass 👏
The best Test series with the bat against England in @BLACKCAPS history 🇳🇿 pic.twitter.com/1lszgvt19J
— ICC (@ICC) June 27, 2022
गोलंदाजीतही ट्रेंट बोल्ट (Trent Boult) १६ विकेट्स घेत अव्वल क्रमांकावर आहे. दोन्ही विभागात पहिल्या क्रमांकावर न्यूझीलंडच्या खेळाडूंचेच वर्चस्व असले तरी त्यांचा एकूण खेळ यजमान संघासमोर कमी पडला आहे. न्यूझीलंड हा सामना गमावल्याने आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशीप २०२१-२३च्या गुणतालिकेत आठव्या स्थानावर राहिला आहे. त्यामुळे ते या स्पर्धेच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
ही मालिका जिंकल्याने इंग्लंडचा नवखा कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) याच्या भारताविरुद्ध जिंकण्याच्या आशा उंचावल्या आहेत. त्यांनी या मालिकेत सरस कामगिरी केली आहे. ही मालिका सुरू होण्याआधी ब्रेंडन मॅक्युलम या न्यूझीलंडच्या माजी कर्णधाराची इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती.
सामना जिंकण्याचे सातत्य ते भारताविरुद्धही कायम ठेवणार आहे, असे मत स्टोक्सने मांडले आहे. इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी सामना १ जुलैला एजबस्टन, बर्मिंघम येथे खेळणार आहेत. हा पूर्वनियोजित सामना असून भारतीय संघ पाच सामन्यांच्या या मालिकेत २-१ने पुढे आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकात विराट नव्हे तर ‘हे’ तिघे ठरतील भारताचे सर्वश्रेष्ठ फलंदाज, माजी दिग्गजाचे सुचक भाष्य
काहीतरी शिजतंय? इंग्लंडच्या महिला क्रिकेटरसोबत लंडनमध्ये फिरतोय अर्जुन, डिनर डेटचे फोटो चर्चेत
ENGvsIND: ८६ कसोटींचा अनुभव असलेल्या गोलंदाजाला मिळणार का संधी? भारतीय संघापुढे मोठा प्रश्न