इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर खेळळा जात आहे. पहिल्या दिवशी मैदान गोलंदाजांनी मारले. सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदज नील वॅगनरने असे काही केले, जे पाहून चाहत्यांचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन अधिक चांगला झाला आहे.
सामन्याच्या पहिल्या दिवशी नील वॅगनर (Neil Wagner) सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित असलेल्या एका चाहत्यासोबत बोलताना दिसला. वॅगनरने या चाहत्याला स्वतःचे पॅड भेट म्हणून दिले. या प्रसंगाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.
ज्याला वॅगनरने पॅड दिले, तो तर नशीबवान होताच. त्याच्या शेजारी उभा असलेल्या काही जणांना देखील वॅगनरने स्वाक्षरी दिली. त्या सर्व चाहत्यांसाठी हा दिवस अविस्मरणीय राहिले हे मात्र नक्की. वॅगनरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ३६ वर्षीय गोलंदाज वॅगनर न्यूझीलंडविरुद्धच्या या पहिल्या कसोटी सामन्यात खेळत नाहीये. प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला जागा मिळू न शकल्यामुळे त्याला बेंचवर बसावे लागेल. परंतु तरीदेखील त्याच्या नावाची चर्चा आणि किंमत चाहत्यांच्या मनात वाढली.
Neil Wagner gifted a pair of pads to one of the fan at Lord's. What a wonderful and sweet gesture by Wagner! pic.twitter.com/h4dfQERKXG
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 2, 2022
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जेम्स अँडरसन आणि मॅथ्यू पॉट्सच्या भेदक माऱ्यामुळे न्यूझीलंडचा पहिला डाव अवघ्या १३२ धावांवर गुंडाळला गेला. अँडरसन आणि पॉट्सने प्रत्येकी ४-४ विकेट्स नावावर केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ देखील स्वस्तात बाद झाला. टिम सउदीने ४ आणि ट्रेंट बोल्टने ३ विकेट्स घेतल्या आणि इंग्लंडला अवघ्या १४१ धावांवर सर्वबाद केले.