---Advertisement---

या कारणामुळे जोफ्रा आर्चर इंग्लंडच्या टी२० संघातून झाला बाहेर

On: गुरूवार, जानेवारी 30, 2020 8:16 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड (South Africa vs England) संघात नुकतीच कसोटी मालिका पार पडली. ही मालिका इंग्लंडने 3-1 च्या फरकाने जिंकली. आता इंग्लंडचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका आणि 3 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. परंतु  इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) जखमी (Injured) असल्याने तो टी20 मालिकेतून बाहेर पडला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान आर्चरच्या उजव्या हाताच्या कोपराला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला या मालिकेतील अंतिम 3 कसोटी सामन्यांसाठी मुकावे लागले होते. आता त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेलाही मुकावे लागणार आहे.

आर्चर पुढील टी20 मालिका खेळणार नसल्याची माहिती इंग्लंड क्रिकेट मंडळाने दिली आहे. इंग्लंड क्रिकेट मंडळाने ट्विटरवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिकेतून आर्चरला बाहेर काढण्यात आले आहे. जोफ्रा, लवकर बरा हो.”

इंग्लंडचा संघ टी20 मालिकेआधी वनडे मालिके खेळणार आहे. या वनडे मालिकेसाठी आधीच इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बेन स्टोक्स, जॉस बटलर, मार्क वूड आणि आर्चरला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे वनडे आणि टी20 मालिका खेळणार नसल्याने आता आर्चर इंग्लंडला परत गेला आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघात 4 ते 9 फेब्रुवारी दरम्यान वनडे मालिका होणार आहे. तर 12 ते 16 फेब्रुवारीदरम्यान टी20 मालिका होणार आहे.

 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत आर्चरचा बदली गोलंदाज म्हणून वेगवान गोलंदाज साकिब महमूदला (Saqib Mahmood) संधी देण्याची शक्यता आहे.

https://twitter.com/Maha_Sports/status/1222871717820813312

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---