Andre Russell Six: वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड संघातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना ग्रेनाडा येथे पार पडला. या सामन्यात यजमान विंडीजने इंग्लंडला 10 धावांनी पराभूत करत सलग दुसरा सामना जिंकला. यासह मालिकेतही 2-0ने आघाडी घेतली. या विजयाचे हिरो ब्रेंडन किंग आणि कर्णधार रोवमन पॉवेल ठरले. मात्र, आंद्रे रसेल याने फक्त 14 धावांची खेळी केली. यात 2 षटकारांचा समावेश होता. यातील एका षटकाराने सर्वांचे लक्ष वेधले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
वेस्ट इंडिजच्या (West Indies) डावादरम्यान अखेरचे षटक टायमल मिल्स टाकत होता. त्याच्या षटकातील चौथ्या चेंडूवर आंद्रे रसेल (Andre Russell) याने आऊटसाईड ऑफच्या जात असलेल्या चेंडूला सीमारेषेच्या पार पाठवले. रसेलने हा षटकार (Andre Russell Six) मारताना संतुलन गमावले आणि मैदानावर कोलांटी उड्या मारल्या. यावेळी त्याचे संतुलन बिघडूनही चेंडू षटकारासाठी पाठवला. आता त्याच्या षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांच्या भुवया उंचावत आहे.
"Only Andre Russell can play that shot with that power, off balance."
.
.#WIvENG #WIvENGonFanCode pic.twitter.com/aKfPzP6S3u— FanCode (@FanCode) December 14, 2023
रसेलने या सामन्यात 10 चेंडूत 14 धावांची खेळी केली. रसेलविषयी बोलायचं झालं, तर त्याने तब्बल 2 वर्षांच्या दीर्घ काळानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. त्याला या मालिकेसाठी संघात निवडले गेले होते. तसेच, त्याने पुनरागमनाच्या सामन्यात धमाल करत बॅट आणि चेंडूने कमाल केली होती. त्यासाठी त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते.
दुसरीकडे, या सामन्याविषयी बोलायचं झालं, तर 20 षटकात वेस्ट इंडिजने 7 विकेट्स गमावत 176 धावांचा डोंगर उभारला होता. यावेळी ब्रेंडन किंग याने नाबाद 82 धावा केल्या. तसेच, कर्णधार रोवमन पॉवेल यानेही 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. इंग्लंडकडून गोलंदाजी करताना आदिल रशीद आणि टायमल मिल्स यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
वेस्ट इंडिजच्या 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड संघाला 20 षटकात 7 विकेट्स गमावत 166 धावा केल्या. यावेळी त्यांच्याकडून सॅम करन याने सर्वाधिक 50 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त एकही फलंदाज 30 धावांचा टप्पा पार करू शकला नाही. सलामीवीर फिलिप सॉल्टने 25 आणि विल जॅक्सने 24 धावांची खेळी केली. दुसरीकडे, मोईन अलीने नाबाद 22 धावा केल्या. रेहान अहमदने 3 चेंडूत 10 धावा केल्या. सध्या जोस बटलर याच्या नेतृत्वाखाली इंग्लंड खराब फॉर्मचा सामना करत आहे. इंग्लंडने यापूर्वी वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे मालिकाही गमावली होती. आता त्यांची टी20 मालिकेतही खराब स्थिती पाहायला मिळत आहे. (eng vs wi 2nd t20i power hitter andre russell smash six even while falling see video)
हेही वाचा-
माजी दिग्गजाने सांगितली शुबमन गिलची मोठी कमजोरी; म्हणाला, ‘त्याने पॉवरप्लेमध्ये…’
नाद करा पण भारतीय महिलांचा कुठं! इंग्लंडला 136 धावांवर केले All Out, दीप्तीने पूर्ण केले विकेट्सचे पंचक