---Advertisement---

‘MS Dhoniची एकच गोष्ट डोक्यात राहिली आणि…’, इंग्लंडच्या नांग्या ठेचताच विंडीजच्या कर्णधाराचा मोठा खुलासा

On: सोमवार, डिसेंबर 4, 2023 12:50 PM
Shai-Hope
---Advertisement---

इंग्लंड संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. रविवारी (दि. 3 डिसेंबर) खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिज संघाने इंग्लंडला 4 विकेट्सने पराभवाची धूळ चारली. तसेच, मालिकेत 1-0ने  आघाडी घेतली. या विजयात कर्णधार शाय होप याचा सिंहाचा वाटा होता. त्याने या सामन्यात वादळी फलंदाजी करत शतक झळकावले.

शाय होप (Shai Hope) याने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत तडाखेबंद शतक ठोकले. इंग्लंड संघाने दिलेल्या 326 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाने 7 चेंडू राखून विजय मिळवला. या सामन्यात वादळी खेळी केल्यानंतर कर्णधार शाय होप याने भारतीय कर्णधार महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली.

शतकी खेळीसाठी होपला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याने सामन्यानंतर भारतीय माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याच्याकडून मिळालेल्या गुरुमंत्राचा खुलासा केला.

धोनीचा गुरुमंत्र
शाय होपने सांगितले की, “हे शतक विजयाच्या उद्देशाने होते आणि मी यासाठीच खेळतो. आनंद आहे की, आम्ही विजय मिळवला. काही काळापूर्वी एमएस धोनीसोबत माझी चर्चा झाली होती. त्यांनी मला म्हटले होते की, तुम्ही नेहमी क्रीझवर जितका विचार कराल, त्यापेक्षा जास्त वेळ घालवता. हीच गोष्ट माझ्या डोक्यात होती. शेफर्ड कमालीच्या फॉर्ममध्ये होता आणि आम्ही विजय मिळवला.”

“मालिकेची शानदार सुरुवात केली आणि पुढील सामन्यातही हेच करू. त्यांच्या सलामी फलंदाजांनी वास्तवात चांगली फलंदाजी केली. आम्ही पुढील सामन्यात थोडी चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न करू. आजच्या सामन्यात आम्ही काही झेलही सोडले, पण तुम्हाला जगातील सर्वोत्तम संघ बनायचे आहे, तर तुम्हालाही जगातील सर्वोत्तम संघासारखे खेळण्यास सुरुवात केली पाहिजे.”

होपची खेळी
खरं तर, होपने या सामन्यात इंग्लंडविरुद्ध 83 चेंडूत 109 धावांची नाबाद शतकी खेळी केली. त्याच्या या खेळीत 4 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा तब्बल 131 इतका होता. शाय होपने सामन्यादरम्यान 5000 वनडे धावांचा आकडाही पार केला.

तसेच, त्याने सर्वात वेगवान 5000 वनडे धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सर व्हिव्हियन रिचर्ड्स आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गजांची बरोबरी केली. (eng vs wi captain shai hope reveals ms dhoni guru mantra to him before 1st odi match against england)

हेही वाचा-
‘अर्शदीप सिंग, तू भारताच्या…’, शेवटच्या ओव्हरमध्ये भारताला विजय मिळवून देताच ट्विटरवर प्रतिक्रियांचा पूर
शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावांचा बचाव करणाऱ्या अर्शदीप सिंगचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘सूर्या म्हणालेला…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---