इंग्लंड संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स खुप दिवसानंतर क्रिकेट मध्ये पुनरागमन करणार आहे. काही दिवसांपूर्वी बेन स्टोक्सला दुखापती कारणामुळे बाहेर जावे लागले होते. परंतु आता बेन स्टोक्स त्यातून पूर्णपणे सावरला झाला आहे. सर्व काही ठीक असेल तर आठ जुलैला कार्डिफमध्ये पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकेल.
स्टोक्स येत्या काही दिवसांमध्ये इंग्लंडच्या टी20 ब्लास्ट 2021 ही मोठी स्पर्धा आपला स्थानिक क्रिकेट संघ डरहम कडून खेळताना दिसून येणार आहे. डरहम क्रिकेट संघाने याची पुष्टी करताना म्हणाले की, ‘तुमचे पुन्हा एकदा संघामध्ये स्वागत आहे बेन स्टोक्स.’ यावर स्टोक्सने सुद्धा संघाचे आभार मानले आणि आपल्या पुनरागमनामुळे आनंदी असल्याचे सांगितले.
डरहम संघाने म्हंटले की, ‘आम्हाला आशा आहे की स्टोक्सच्या उपस्थितीमध्ये संघ क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचेल. स्टोक्स पुढील पाच टी20 सामने खेळू शकेल. कारण या सामन्यांमध्ये उपस्थित नसण्याचे कोणतेही कारण सध्या तरी नाही.’ विशेष म्हणजे इंग्लंड पाकिस्तान विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळण्यापूर्वी सहा दिवस अगोदर डरहम संघ लीसेस्टरशायर विरुद्ध सामना खेळणार आहे.
मागील दौऱ्यात स्टोक्सची निराशाजनक कामगिरी
साल 2020 च्या सुरुवातीला इंग्लंड संघाकडून केवळ काहीच सामने स्टोक्सला खेळता आले. त्यानंतर एप्रिल मध्ये आयपीएल मधील राजस्थान रॉयल संघाकडून खेळताना स्टोक्सला दुखापत झाली. सामना सुरू असताना झेल पकडण्याच्या दरम्यान त्याच्या बोटांना दुखापत झाली. यानंतर स्टोक्स स्पर्धेबाहेर गेला. परंतु या दरम्यान तो संघासोबत राहिला होता. नंतर काही दिवसांनी त्याने स्वदेशी परत जाण्याचा निर्णय घेतला.
असे म्हंटले जात आहे की, बेन स्टोक्स टी 20 ब्लास्ट मध्ये डरहम संघाकडून पहिला 11 जूनला यॉर्कशायर विरुद्ध सामन्यात सहभागी होणार होता. परंतु पूर्णपणे तंदुरूस्त नसल्यामुळे काही दिवसांनी संघात सहभागी होण्याचा निर्णय स्टोक्सने घेतला. स्टोक्सने काही दिवसांपूर्वी आपल्या दुखापतीबद्दल बोलतांना सांगितले की, “आता मी गोलंदाजी करू शकत आहे. मी जिममध्ये देखील जात आहे आणि थोडी फार फलंदाजी देखील करत आहे. मी पूर्णपणे बरा होत आहे. आणि काही दिवसातच मी माझा सराव पुन्हा एकदा सुरू करू शकतो.”
महत्त्वाच्या बातम्या:
WTC फायनल: पहिल्या षटकानंतर बुमराहला बदलावी लागली जर्सी, हे होते कारण
रोनाल्डोने कोको-कोलाच्या बॉटल हटवल्याच्या व्हिडिओवर करिना कपूरची ‘भन्नाट’ रिऍक्शन
स्टायलिश कॅप्टन कूल! पाहा धोनीच्या दहा हटके हेअरस्टाईल