---Advertisement---

स्टोक्सच्या सावत्र वडिलांनी गोळी झाडून केलती मुलांची हत्या, वाचा अंगावर शहारे आणणारा प्रसंग

On: रविवार, जून 6, 2021 1:02 PM
Ben Stokes
---Advertisement---

इंग्लंड संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स हा सध्या यशाच्या शिखरावर आहे. गेल्या काही वर्षात त्याने क्रिकेटच्या तिनही स्वरुपांमध्ये आपली वेगळी छाप सोडली आहे. त्याने विश्वचषक २०१९ स्पर्धेत इंग्लंड संघाला विश्वविजेता बनवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. परंतु त्याच्या वैयक्तिक आयुष्यात त्याने भरपूर संघर्ष केला आहे. याबद्दल खूप कमी लोकांना माहीत की, त्याच्या वडिलांसोबत विवाह करण्यापूर्वी बेन स्टोक्सची आई डेब यांना पहिल्या विवाहाची २ मुले होती.

इंग्लंडचे प्रसिद्ध वृत्तपत्र ‘द सन’मधील एका वृत्तानुसार, बेन स्टोक्सचा भूतकाळ खूप भयानक होता. बेन स्टोक्सच्या सावत्र वडिलांनी त्याचा ४ वर्षांचा भाऊ अँड्र्यू आणि ८ वर्षांची बहीण ट्रेसी यांची गोळी झाडून हत्या केली होती. ही घटना बेन स्टोक्सचा जन्म होण्यापूर्वी १९८८ मध्ये घडली होती.

बेन स्टोक्सची आई डेब यांचा पहिल्या पतीसोबत काडीमोड झाला होता. त्यानंतर त्यांच्या कानावर ही बातमी आली होती की, डेब आणि रग्बी प्रशिक्षक गेरार्ड स्टोक्स यांचे एकमेकांना भेटणे सुरू आहे. त्यावेळी संतापात येऊन रिचर्ड डन (डेब यांचे पहिले पती) यांनी टोकाची भूमिका घेत हे अंगाला काटे आणणारे कृत्य केले होते. त्यांनी आपल्या मुलांचा जीव घेत स्वतःही आत्महत्या केली होती. त्यांनतर बेन स्टोक्सच्या आईने गेरार्डसोबत विवाह केला होता.

स्टोक्सने आपल्या आयुष्यातील सुरुवातीचे दिवस न्यूझीलंडमध्ये घालवले होते. त्यानंतर बेन स्टोक्स १२ वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या आई-वडिलांनी न्यूझीलंडमधून इंग्लंडमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता.

बेन स्टोक्सने आतापर्यंत एकूण ७१ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला ३७.० च्या सरासरीने ४६३१ धावा करण्यात यश आले आहे. यासोबतच वनडे क्रिकेटमध्ये त्याने ९८ सामन्यात ४०.८ च्या सरासरीने २८१७ धावा केल्या आहेत. तर टी-२० क्रिकेटमध्ये त्याने २०.१ च्या सरासरीने ४४२ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

आजही इंग्लंडच्या मैदानावर यष्टीरक्षक धोनीचाच धाक, निवृत्तीच्या ६ वर्षांनंतरही ‘हा’ विक्रम अबाधित

क्रिकेटसाठी भारत सोडून पाकिस्तानात वसलेले शिलेदार, नवव्या क्रमांकावर झुंजार शतकाची आहे नोंद

चक्क ३०० किमीचा प्रवास करत विहारीने मध्यरात्री वाजवला तिचा दरवाजा, वाचा त्याची ‘प्यार वाली लव्हस्टोरी’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---