---Advertisement---

चालू सामन्यात कोडच्या साहाय्याने माहिती पुरवल्याबद्दल मॉर्गनचे मोठे भाष्य; म्हणाला…

On: शुक्रवार, डिसेंबर 4, 2020 9:06 AM
---Advertisement---

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघात नुकतीच तीन सामन्यांची टी20 मालिका पार पडली. या मालिकेत इंग्लंडने उत्कृष्ट प्रदर्शन करत 3-0 असा विजय मिळवला. मात्र, मालिकेच्या अखेरच्या टी20 सामन्यात एक संशयास्पद दृश्य टिपलं गेल.

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या डावादरम्यान इंग्लंड क्रिकेट संघाचे विश्लेषक नेथन लेमन इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गन याला एका विशिष्ट कोडच्या साहाय्याने माहिती पुरवताना कॅमेरामध्ये कैद झाले.

लेमन इंग्लंडच्या ड्रेसिंगरुममधून कर्णधार ओएन मॉर्गनला एक लहान बोर्ड दाखवताना दिसले. यात इंग्रजी वर्णमालेतील अक्षर आणि संख्या लिहिली होती. या विशिष्ट कोडच्या माध्यमातून लेमन चालू सामन्याविषयीची महत्वाची पुरवत होते, जेणेकरून मॉर्गनला कर्णधार म्हणून निर्णय घेण्यास मदत होईल.

तसेच याबद्दल इंग्लंडने सामनाधिकारी अँडी पॅक्रॉफ्ट आणि भ्रष्टाचारविरोधी अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती, असेही वृत्त आहे. इंग्लंडच्या प्रवक्त्याने हे स्पष्ट केले आहे की हे कोड कोणत्याही प्रकारे कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती आणि शेवटी मैदानात अंतिम निर्णय घेण्यात येतो.

शुक्रवारी ( 4 डिसेंबर ) इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होईल.

पहिल्या वनडे सामन्यातही अशा प्रकारचा प्रयोग करण्याचे संकेत कर्णधार ओएन मॉर्गनने दिले आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला, “यात काहीही अप्रिय नाही , तो 100 टक्के खेळभावनेचा भाग आहे.”

तसेच इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉस बटलरनेही बीबीसीशी बोलताना म्हटले आहे की हा केवळ एक प्रयोग होता. बटलरने हे देखील सांगितले की मॉर्गन आणि लेमन गेल्या काही दिवसांपासून त्यावर काम करत आहेत.

मात्र इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉने या घटनेवर टीका केली होती. त्यानी हा मूर्खपणा असल्याचे म्हटले होते.

विशेष म्हणजे इंग्लंडने या प्रयोगास ‘थेट माहिती संसाधन’ म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

भारताविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यातून ‘या’ दोन खेळाडूंचे होऊ शकते ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन

विलियम्सनचं विक्रमी द्विशतक! ‘हे’ ३ खास रेकॉर्ड करत भल्याभल्यांना टाकलंय मागे

रबाडानंतर ‘हा’ खेळाडूही बाहेर; इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघाचा मोठा निर्णय

ट्रेंडिंग लेख –

गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर

भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर

‘हीच’ ती ३ तीन कारणे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसर्‍या वनडेत भारताकडून पत्करावा लागला पराभव 

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---