---Advertisement---

कोरोना इफेक्ट! या क्रिकेट बोर्डाला बसणार ३६०० कोटींचा फटका? तब्बल ८०० दिवस…

On: गुरूवार, मे 7, 2020 7:50 PM
---Advertisement---

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे क्रिकेटजगतात अनेक क्रिकेट बोर्डांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचाही समावेश आहे. ईसीबीला तब्बल ३६०० कोटींचा फटका बसणार असल्याचे ईसीबीचे मुख्य कार्यकारी टॉम हॅरिसन यांनी मंगळवारी (५ मे) सांगितले.

हॅरिसन (Tom Harrison) यांनी दिलेल्या माहितीनुसार, “कोरोनामुळे १ जुलैपर्यंत देशात व्यावसायिक क्रिकेटवर बंदी घालण्यात आली आहे.

‘द हंड्रेड’ (The Hundred) क्रिकेट स्पर्धाही पुढील वर्षापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे आयोजन यावर्षी १७ जुलै ते १५ ऑगस्टदरम्यान होणार होते. तसेच लॉकडाऊनमुळे व्यावसायिक क्लबला ८०० दिवसांच्या क्रिकेटचेही नुकसान होण्याची शक्यता आहे.”

हॅरिसन पुढे म्हणाले की, “यावर्षी मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने होण्याची शक्यता खूप कमी आहे. असे असले तरी आम्ही उन्हाळ्यामध्ये कसोटी क्रिकेट खेळून यामुळे होणाऱ्या नुकसानाची काही प्रमाणात भरपाई करणार आहोत. इंग्लंड क्रिकेट संघाला जुलै आणि ऑगस्टमध्ये वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. याव्यतिरिक्त आयर्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धही वनडे मालिका खेळायची आहे.”

हॅरिसन ‘द हंड्रेड’ लीगबद्दल (१०० चेंडूंची स्पर्धा) म्हणाले की, “ईसीबीने (ECB) या स्पर्धेचे १ लाख ७० हजार तिकिटांची विक्री केली होती. तर पहिल्या वर्षीच्या स्पर्धेचे बजेट जवळपास ३७६ कोटी रुपये होते. १९९९नंतर पहिल्यांदा बीबीसीवर क्रिकेट लाईव्ह दाखविण्यात येणार होते. यावरून याच्या मनोरंजनाचा अंदाज लावला जाऊ शकतो.”

हॅरिसन पुढे म्हणाले की, “एका अंदाजानुसार ‘द हंड्रेड’ लीगला पहिल्या वर्षामध्येच १०३ कोटी रुपयांचा फायदा होऊ शकतो. यावरून समजते की, आम्ही किती मजबूत स्थितीत आहेत. क्रिकेट विश्वचषक सोडला तर, यापूर्वी इंग्लंडमध्ये कोणत्याही क्रिकेट सामन्याची तिकीटे इतक्या वेगाने विकली गेली नव्हती.”

“युवा खेळाडूंव्यतिरिक्त परिवानेही मोठ्या संख्येने ‘द हंड्रेड’ लीगची तिकीटे विकत घेतली आहेत. आम्ही देशात क्रिकेटचे प्रेक्षकांमध्ये वाढ करण्यासाठी जे पाऊल टाकले आहे, ते नक्कीच योग्य आहे,” असेही ते पुढे म्हणाले.

‘द हंड्रेड’ लीगमध्ये पुरुष आणि महिलांचे प्रत्येकी ८ संघ भाग घेणार आहेत. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये लीगच्या ८ संघांनी ड्राफ्टच्या माध्यमातून पुरुष खेळाडूंची निवड केली होती. तर महिला संघासाठी खेळाडूंची निवड प्रक्रिया सुरु होती. ईसीबीने उन्हाळ्याच्या सुट्या लक्षात घेत ‘द हंड्रेड’ लीग सुरु करण्याची योजना बनवली होती. प्रत्येक फ्रंचायझीमध्ये एक महिला आणि एक पुरुषाचा संघ असेल.

ट्रेंडिंग घडामोडी-

-…तर मैदानावर सेलिब्रेशन करताना खेळाडू हात मिळविण्याऐवजी करतील नमस्ते!

-रोहित म्हणतो; ३ महिन्यांच्या गॅपनंतर फलंदाजांसमोर असणार हे सर्वात मोठे…

-विराट आयपीएलमधील आजपर्यंतचा सर्वात युवा कर्णधार, नावावर आहे धोनीपेक्षा खास विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---