भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात उभय संघ पुनर्निधारीत पाचव्या कसोटी सामन्यासह ३ सामन्यांची वनडे आणि टी२० मालिका खेळली जाणार आहे. ७ जुलै ते १७ जुलै या काळात दोन्हीही संघ मर्यादीत षटकांच्या मालिका खेळणार आहेत. या मालिकांसाठी शुक्रवारी (०१ जुलै) इंग्लंडच्या निवड समितीने संघ जाहीर केले आहेत.
ओएन मॉर्गनच्या निवृत्तीनंतर जोस बटलर (Jos Buttler) याच्या हाती वनडे आणि टी२० संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे सोपवली गेली आहेत. वनडे संघात बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जो रूट यांचे पुनरागमन झाले आहे. तसेच इंग्लंडचा अनुभवी फिरकीपटू आदिल रशिद (Adil Rashid) वनडे आणि टी२० मालिकेला मुकणार आहे. त्याने मक्का येथील हज यात्रेसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडे (ईसीबी) सुट्टीची परवानगी मागितली होती, जी ईसीबीने मंजूर केली आहे.
भारताविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ-
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जेसन रॉय, हॅरी ब्रूक, लियाम लिविंगस्टोन, सॅम करन, रिचर्ड ग्लीसन, ख्रिस जॉर्डन, डेविड मलान, टायमल मिल्स, मॅट पार्किन्सन, फिल सॉल्ट, रीस टॉपली, डेविड विली
Our squad to take on @BCCI in the three-match IT20 series 💥
More here: https://t.co/UumWQ5m7xa
🏴 #ENGvIND 🇮🇳 @Vitality_UK pic.twitter.com/ZNqEtmHNZC
— England Cricket (@englandcricket) July 1, 2022
असे आहे वनडे मालिकेचे वेळापत्रक
टी२० मालिकेनंतर दोन्हीही संघ वनडे मालिका खेळतील. १२ जुलैपासून वनडे मालिकेला सुरुवात होईल. लंडनच्या लेनिंग्टन ओव्हल मैदानावर पहिला वनडे सामना रंगेल. त्यानंतर १४ जुलैला लॉर्ड्समध्ये दुसरा व १७ जुलैला मँचेस्टरमध्ये तिसरा व अखेरचा वनडे सामना खेळवला जाईल.
Our squad for the three-match ODI series with @BCCI! 🧢
More here: https://t.co/oLGb3baHyu
🏴 #ENGvIND 🇮🇳 @RoyalLondon pic.twitter.com/SpVsDND6QO
— England Cricket (@englandcricket) July 1, 2022
भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंडचा संघ-
जोस बटलर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, जेसन रॉय, हॅरी ब्रूक, मोईन अली, सॅम करन, लियाम लिविंगस्टोन, जो रूट, मॅट पार्किन्सन, फिल सॉल्ट, रीस टॉपली, डेविड विली, बेर्डन कार्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ENGvsIND: पंत-जडेजा जोडीची कमाल सचिन-अझरूद्दीनच्या ‘त्या’ २५वर्षे जुन्या विक्रमाशी केली बरोबरी
भारताची विजयी सलामी, पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेला ४ विकेट्सने झुकवत मालिकेत १-०ने आघाडी
जेव्हा वेस्ट इंडिजच्या बलाढ्य संघाला जगातील सर्वात कमजोर संघाने दाखवला होता चांगलाच इंगा