---Advertisement---

‘या’ 3 संघांच्या हाती अजूनही नाही, चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद!

---Advertisement---

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champions Trophy 2025) सुरू होण्याची तारीख अंतिम टप्प्यात आली आहे. चाहते या हायव्होल्टेज स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदाची ही आयसीसी स्पर्धा पाकिस्तानच्या यजमानपदाखाली (19 फेब्रुवारी) पासून खेळली जाईल. ज्यामध्ये 8 संघ सहभागी होत आहेत. दरम्यान या मेगा स्पर्धेचा फायनल सामना (9 मार्च) रोजी रंगणार आहे.

सर्व संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सज्ज आहेत. ही मेगा स्पर्धा जिंकण्यात अनेक संघ यशस्वी झाले आहेत. ज्यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया सारख्या संघांनी विजय मिळवला आहे. पण काही संघ असे आहेत जे अद्याप चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकू शकलेले नाहीत. या बातमीद्वारे आपण या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या त्या 3 संघांबद्दल जाणून घेऊया, जे अद्याप जेतेपद जिंकू शकले नाहीत.

1) इंग्लंड- आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात, क्रिकेटचे जन्मस्थान असलेल्या इंग्लंडला आतापर्यंत विजेतेपद जिंकण्यात यश आले नाही. या स्पर्धेच्या पहिल्याच आवृत्तीपासून खेळत असलेल्या इंग्लंडने अनेक वेळा या स्पर्धेचे आयोजन केले आहे. पण त्याला यश मिळाले नाही. या स्पर्धेच्या 2013च्या आवृत्तीत इंग्लंडचा संघ फायनलमध्ये पोहोचला होता. पण तिथेही त्यांचे विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगले. दरम्यान त्यांना फायनलमध्ये भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

2) बांगलादेश- चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात आतापर्यंत असे काही संघ आहेत, जे स्वतः कमकुवत असल्याचे सिद्ध झाले आहेत. ज्यामध्ये एक संघ बांगलादेशचा आहे. यावेळीही हा आशियाई संघ कमकुवत ठरू शकतो. या संघाला आतापर्यंत एकही विजेतेपद जिंकता आलेले नाही. या मेगा स्पर्धेचा पहिला यजमान संघ बांगलादेश आपल्या पहिल्या जेतेपदाची वाट पाहत आहे.

3) अफगाणिस्तान- गेल्या काही काळापासून अफगाणिस्तान संघ जागतिक क्रिकेटमधील सर्वात धोकादायक संघ म्हणून उदयास येत आहे. या संघाने मोठ्या संघांना आश्चर्यचकित केले आहे. अफगाणिस्तानचा संघ पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळत आहे. या स्पर्धेत हा संघ आपल्या गटातील संघांना धक्का देऊ शकतो. अफगाणिस्तान संघ पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्राॅफी खेळत आहे, त्यामुळे ते त्यांच्या पहिल्या जेतेपदाची वाट पाहत आहेत हे स्पष्ट आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चे वेळापत्रक –

19 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, नॅशनल स्टेडियम, कराची
20 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
21 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नॅशनल स्टेडियम, कराची
22 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
23 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
24 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
25 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
26 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
27 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
28 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
1 मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, नॅशनल स्टेडियम, कराची
2 मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
4 मार्च – सेमीफायनल 1, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
5 मार्च – सेमीफायनल 2, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
9 मार्च – फायनल, गद्दाफी स्टेडियम, लाहोर (भारत फायनलमध्ये पोहोचल्यास ठिकाण दुबई असेल)

महत्त्वाच्या बातम्या-

“वनडे वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये पोहोचले होते हे संघ, चॅम्पियन्स ट्रॉफीत काय करणार कमाल?”
क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी! आयपीएल 2025चे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार
“राशिद खानचा खेळ वसीम अक्रमच्या हद्दीला ओलांडतो, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची मोठी दखल.”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---