---Advertisement---

भारतीय चाहत्याचा नादच नाय! विराटला ट्रोल करायला निघालेल्या ‘बार्मी आर्मी’ची केली बोलतीच बंद

On: शनिवार, ऑगस्ट 20, 2022 11:19 AM
---Advertisement---

भारतीय संघाच्या इतिहासातील महान फलंदाजांमध्ये विराट कोहली याची गणना केली जाते. विराटने भारतीय संघाला आजपर्यंत अनेक सामने जिंकवून दिले आहेत आणि धावाही मोठ्या प्रमाणात केल्या आहेत. असे असले तरी, मागच्या मोठ्या काळापासून विराट खराब फॉर्ममध्ये आहे आणि त्याला अपेक्षित प्रदर्शन करता आले नाहीये. याच पार्श्वभूमीवर इंग्लंड संघाचा अधिकृत फॅन ग्रुप ‘बार्मी आर्मी’ यांनी त्याला ट्रॉल करण्याचा प्रयत्न केला, जो  चाहत्यांना उलटवून लावल्याचे पाहायला मिळाले. 

विराट कोहली (Virat Kohli) मागच्या जवळपास अडीच वर्षांपेक्षा अधिका काळापासून एकही शतक करू शकला नाहीये. त्याने नोव्हेंबर २०१९ मध्ये शेवटचे शतक केले होते, जेव्हा भारत आणि बांगलादेश यांच्या डे-नाईट कसोटी सामना खेळळा गेला होता. तेव्हापासून विराट धावा करण्यासाठी झगडताना दिसत आहे.

नुकतेच विराटच्या शेवटच्या शतकाला १००० दिवस पूर्ण झाले. सततच्या खराब प्रदर्शनामुळे विराट कोहलीचे चाहेत निराश आहेत, तर टिकाकार एकही संधी सोडत नाहीयेत. अशातच ‘बार्मी आर्मी’ (Barmi Army) कढून असे ट्वीट केले गेले की, “१००० दिवस.” ट्वीटमध्ये विराटचे नाव जरी लिहिले गेले नसले, तरी ट्वीट विराटला ट्रोल करण्यासाठी केले गेले आहे, हे चाहत्यांनी तत्काळ ओळखले. बार्मी आर्मीच्या या ट्वीटवर अनेक भारतीय चाहत्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

अनेकांनी विराट आणि इंग्लंडचा संपूर्ण संघ अशी तुलना केली आहे. तर काहींनी विराट आणि इंग्लंडचा आघाडीचा फलंदाज जो रुटची तुलना केली आहे. एका चाहत्याने स्पष्ट केले की, इंग्लंडने भारत दौऱ्यातील त्यांची शेवटची मालिका  ३,५३२ दिवसांपूर्वी जिंकली होती. तसेच एकाने विराटच्या तुलनेत जो रुट किती मागे आहे, हे स्पष्ट केले. विराटने पदार्पण केल्यानंतर इतर कोणताही फलंदाज त्याच्या बरोबरीने धावा करू शकला नासल्याचे या ट्वीटमध्ये दिसते.

एका चाहत्याच्या मते विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा या तीन फलंदाजांपुढे इंग्लंडचा संपूर्ण संघ देखील कमजोर पडतो. चाहत्यांच्या अशाच प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. एकंदरीत पाहता बार्मी आर्मीने केलेले हे ट्वीट त्यांनाच महागात पडल्याचे दिसते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

मयंक अगरवालचा बॉल बॉय राहिलेल्या चेतनचे तुफानी शतक, फक्त बाउंड्रींनीच फटकावले ६८ रन्स

छोरी छा गयी! १८ वर्षाची ‘अंतिम’ बनली कुस्तीची नवी वर्ल्ड चॅम्पियन

क्रिकेट इतिहासातील इंग्लंड-पाकिस्तानचा ‘तो’ सामना, ज्याचा तीनदा लागला निकाल; इंझमामवर ४ वनडेचीही लागली बंदी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---