जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघात सध्या द वंडरर्स स्टेडियम येथे चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने मोठा पराक्रम केला आहे. त्यांनी या सामन्यात पहिल्या डावात 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे.
तसेच त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 5 लाख धावा पूर्ण करण्याचाही टप्पा पार केला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 5 लाखांपेक्षा अधिक धावा करणारा इंग्लंड पहिलाच संघ ठरला आहे. त्यांनी 1022 वा कसोटी सामना खेळताना हा कारनामा केला आहे.
कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या संघांच्या यादीत इंग्लंड पाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा संघ आहे. ऑस्ट्रेलियाने 830 कसोटी सामन्यात 4,32,706 धावा केल्या आहेत. तसेच या यादीत भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर असून भारताने 540 कसोटी सामन्यात 2,73,518 धावा केल्या आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे संघ –
5,00,000 – इंग्लंड
4,32,706 – ऑस्ट्रेलिया
2,73,518 – भारत
2,70,441 – वेस्ट इंडिज
2,16,452 – दक्षिण आफ्रिका
2,09,869 – पाकिस्तान
2,04,172 – न्यूझीलंड
1,45,218 – श्रीलंका
53,115 – बांगलादेश
49,869 – झिम्बाब्वे
1,584 – अफगाणिस्तान
1,174 – आयर्लंड