सध्या आयसीसी महिला विश्वचषक २०२२ न्यूझीलंडमध्ये सुरू आहे. विश्वचषकाचा १९वा सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड संघांमध्ये रविवारी (२० मार्च) खेळला गेला. ऑकलंड येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा सामना इंग्लंड संघाने १ विकेटने जिंकला. या सामन्यात इंग्लंडची कर्णधार हीदर नाइटने शानदार झेल घेतला. तिने घेतलेल्या झेलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/CbTlyWplk6Z/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again
आयसीसी महिला विश्वचषक २०२२मध्ये अनेक खेळाडूंनी अनोख्या पद्धतीने झेल घेतले आहेत. हे झेल पाहून चाहते आणि प्रेक्षक थक्क होत आहेत. आयसीसीने हीदरच्या झेलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. न्यूझीलंडच्या डावाच्या ३९व्या षटकात हा प्रकार पाहायला मिळाला. न्यूझीलंडची फलंदाज ली ताहुहूने (Lea Tahuhu) तिसऱ्या चेंडूवर असा शाॅट खेळला जो हवेत उडला. हे पाहून असे वाटले नाही की, इंग्लंडची कर्णधार झेल घेईल, असे वाटले नव्हते. परंतु ज्या पद्धतीने हीदरने तो झेल घेतला तिच्या सोबतच्या खेळाडूंना सुद्धा काही काळ विश्वास बसला नाही. आयसीसीने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, हीदर नाइटच्या हातून शानदार झेल.
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने १० विकेट गमावत ४८.५ षटकांत २०३ धावा केल्या. न्यूझीलंड खेळताना मेडी ग्रीनने ५२ धावा केल्या. ती नाबाद राहिली. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. डॅनियल वाॅटने १२ धावा केल्या. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा ठरला.
इंग्लंड संघाने ५ सामन्यांपैकी ३ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच, न्यूझीलंड संघाने ६ सामन्यांतील २ सामन्यांत विजय मिळवला आहे आणि तो गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. २०वा सामना सोमवारी (२१ मार्च) पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलच्या ‘या’ तीन दिग्गज कर्णधारांपुढे विरोधी संघांना नेहमीच फुटतो घाम, वाचा कामगिरी
आयपीएलच्या इतिहासात सलग दोनदा ‘पर्पल कॅप’ जिंकणारा एकमेव पठ्ठ्या, भारतीय संघाचा ‘तो’ हुकमी एक्का
आयपीएलमध्ये विराट ‘या’ बाबतीत आख्ख्या मुंबई इंडियन्स आणि केकेआर संघांना सरस