---Advertisement---

जो रुटचे मोठे मनं! पराभवानंतरही भारताला दिल्या कसोटी चॅम्पियशीपसाठी शुभेच्छा; म्हणाला…

On: रविवार, मार्च 7, 2021 5:15 PM
---Advertisement---

अहमदाबादमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळवला आहे. तसेच ही मालिका भारतीय संघाने ३-१ ने आपल्या नावावर केली आहे. यासोबतच भारतीय संघाने दिमाखात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अशातच चौथा कसोटी सामना गमावणाऱ्या इंग्लंड संघाच्या कर्णधाराने पराभवाचे कारण सांगितले आहे.

चेन्नईत झालेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने २२७ धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर पुढील तीन सामन्यात इंग्लंड संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. चौथा कसोटी सामना गमावल्या नंतर इंग्लंड संघाच्या कर्णधाराने पराभवाचे स्पष्टीकरण देत असताना म्हटले,” आम्ही फक्त पहिल्याच कसोटी सामन्यात चांगले खेळलो. त्यानंतर आम्हाला हवा तसा खेळ करता आला नाही. भारतीय संघाने मागील तीन सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांनी आम्हाला प्रत्येक क्षेत्रात मागे सोडल आहे. यातून आम्हाला शिकण्याची आणि आणखीन चांगले प्रदर्शन करण्याची गरज आहे.”

युवा खेळाडू रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदरचे केले कौतुक

ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेपासून जबरदस्त कामगिरी करणाऱ्या रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदरने या मालिकेत देखील आपल्या कामगिरीने भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. या दोघांचे कौतुक करताना जो रूट म्हणाला.” रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत आमच्या हातातून सामना खेचून घेतला. ते पण तेव्हा, जेव्हा सामना आमच्या हातात होता. आम्हाला जितक्या धावा करायचा होत्या तितक्या करण्यात आम्ही अपयशी ठरलो.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी रुटने दिल्या शुभेच्छा

या मालिकेत विजय मिळाल्यानंतर भारतीय संघाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाला शुभेच्छा देत जो रूट म्हणाला, “भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले. मुख्यता फिरकी गोलंदाज. तसेच भारतीय संघाला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा.”

“माझ्यासाठी पहिल्या कसोटी सामन्यातील दुहेरी शतक आणि तिसऱ्या कसोटी सामन्यातील पाच गडी बाद करणे हे आठवणीत राहील. ही उत्कृष्ट मालिका होती आणि याचा आम्ही भरपूर आनंद घेतला. तसेच आणखीन सामने खेळणे बाकी आहे. हे सामने मर्यादीत षटकांचे असणार आहेत. आम्ही आणखीन चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करू.

महत्त्वाच्या बातम्या 

इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटूला ‘ते’ ट्विट पडले महागात, मिळाली जीवे मारण्याची धमकी

मालिकावीर ठरलेल्या आर अश्विनकडे पत्नीची खास मागणी; म्हणाली, ‘बायोबबल तोड आणि…’

“हेच भारताला जिंकायला १० धावा असताना झाले असते तर…”, वॉशिंग्टनचे शतक हुकल्यावर वडिलांची संतप्त प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---