मुंबई । सुरक्षेच्या कारणास्तव 2005-06 पासून इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौर्यावर आला नाही. परंतु अलिकडच्या काळात इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डा (ईसीबी) येत्या दोन वर्षांत या देशाच्या दौर्यावर जाण्याबद्दल सकारात्मक विचार करत आहे. इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड यांनी इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार असल्याचे संकेत दिले आहे.
बुधवारी ओल्ड ट्रॅफर्ड येथे पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी सिल्व्हरवुडने स्काय स्पोर्ट्सला सांगितले की, “माझ्यासाठी हे आश्चर्यकारक आहे की या विषयावर पुन्हा एकदा चर्चा होत आहे. आम्ही पुन्हा तिथे जाण्याचा विचार करीत आहोत. व्यक्तिशः मला तिथे जायला काहीच हरकत नाही. ”
सिल्व्हरवुडने सूचित केले की त्याचा संघ पाकिस्तानच्या दौर्यावर जाणार आहे. ते म्हणाले की,” इंग्लंडचे फलंदाज पाकिस्तानच्या सपाट खेळपट्ट्यांवर खेळायला उत्सुक आहेत. मी तेथे कधीच गेलो नव्हतो म्हणून तिथे जाऊन खेळपट्टी पाहून आनंद होईल. आणि मला माहित आहे की आमचे फलंदाज त्यांच्या खेळपट्ट्यांवर खेळायला उत्सुक आहेत.”
प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुडच्या वक्तव्यापूर्वी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी ईसीबीला २०२२ च्या दौऱ्यापूर्वी आपल्या संघाला पाकिस्तान दौऱ्यावर पाठविण्याचा आग्रह केला होता. दोन्ही संघात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला बुधवारी मँचेस्टर येथून सुरुवात झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतातील ‘या’ क्रिकेट असोसिएशनची ३ मैदाने क्रिकेट सामन्यांसाठी सज्ज
भारतातच होणार २०२१चा टी२० विश्वचषक तर २०२२मध्ये होणार…
ट्रेंडिंग लेख –
फलंदाजांच्या कानाजवळून शिट्टीचा आवाज काढत जाणारे चेंडू टाकण्यासाठी कुप्रसिद्ध ठरलेला गोलंदाज
सर ब्रॅडमननंतर ऑस्ट्रेलियाचा डंका जगभर वाजवणारा दुसरा क्रिकेटर
आयपीएल २०२०: हे ५ फलंदाजांच्या बॅटमधून यंदा होऊ शकते षटकारांची बरसात