---Advertisement---

बिग ब्रेकिंग- तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूला पाठवले मायदेशी

On: मंगळवार, फेब्रुवारी 16, 2021 2:07 PM
---Advertisement---

इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून चार कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनतर १-१ अशी बरोबरी झाली आहे. आता इंग्लंडने मंगळवारी(१६ फेब्रुवारी) तिसऱ्या कसोटीसाठी १७ जणांचा संघ जाहीर केला आहे.

इंग्लंडने जाहीर केलेल्या १७ जणांच्या संघात जॉनी ब्रेअरस्टो आणि मार्क वूडचा समावेश करण्यात आला आहे. तर मोईन अलीला विश्रांती देण्यात आली असून तो मायदेशी म्हणजेच इंग्लंडला परतणार आहे. त्यामुळे आता तो भारताविरुद्धच्या उर्वरित शेवटच्या दोन्ही कसोटीसाठी उपलब्ध असणार नाही.

याबरोबरच जो रुटच तिसऱ्या सामन्यात इंग्लंडचे नेतृत्वपद सांभाळणार आहे. तसेच या संघात बेन स्टोक्स, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, जॉस बटलर असे काही अनुभवी खेळाडू तिसऱ्या सामन्यासाठीही कायम आहेत.

जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर होणार तिसरा कसोटी सामना

तिसरा कसोटी सामना २४ फेब्रुवारीपासून अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम असणाऱ्या मोटेरा स्टेडियमवर होणार आहे. हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. भारतातील हा दुसराच दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. तर भारतीय क्रिकेट संघाचा हा एकूण तिसरा तर इंग्लंडचा हा एकूण चौथा दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे.

भारताने यापूर्वी कोलकाता येथे पहिल्यांदा दिवस-रात्र कसोटी सामना खेळला होता. त्यात भारताने विजय मिळवला होता. तर ऑस्ट्रेलियामध्ये ऍडलेड येथे झालेल्या दुसऱ्या दिवस-रात्र कसोटीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच इंग्लंडने खेळलेल्या ३ दिवस-रात्र कसोटी सामन्यांपैकी १ सामना जिंकला आहे. तर २ सामने पराभूत झाले आहेत.

तसेच पुर्नबांधणी करण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियमवर होणारा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असेल.

तिसर्‍या कसोटीसाठी इंग्लंड संघ:

जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, डॉमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, झॅक क्रॉवली, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ऑली पोप, डॉम सिब्ली, बेन स्टोक्स, ऑली स्टोन, ख्रिस वॉक्स, मार्क वूड.

महत्त्वाच्या बातम्या –

…आणि अश्विनमुळे चेन्नईचे प्रेक्षक भावुक, समालोचकाच्या तमिळ भाषेतील प्रश्नांची अश्विनने दिली तमिळमध्येच उत्तरं

टेस्ट चॅम्पियनशिप: विजयानंतरही फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी भारताला टेंशन; अशी आहेत समीकरणे

INDvsENG 2nd Test : भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची शरणागती, तब्बल ३१७ धावांनी टीम इंडियाचा दणदणीत विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---