---Advertisement---

दुख:द! माजी इंग्लिश कर्णधाराचे निधन, प्रथम श्रेणीत नावे होत्या २४ हजार धावा अन् २००० विकेट्स

On: रविवार, डिसेंबर 26, 2021 12:51 PM
Ray-Ellingworth
---Advertisement---

क्रिकेटजगतासाठी शनिवारचा दिवस (२५ डिसेंबर) चांगला नाही राहिला. या दिवशी इंग्लंडचे माजी कर्णधार रे इलिंगवर्थ (Ray Illingworth) यांनी जगाचा निरोप घेतला. ते ८९ वर्षांचे होते. ते मागील बऱ्यात काळापासून कँसरशी (Esophageal Cancer) लढत होते. यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लबने त्यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे.

इलिंगवर्थ यांनी या वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात खुलासा केला होता की, त्यांना कँसर असून त्यावर उपचार सुरू आहे. ते म्हणाले होते की, त्यांना एसोफेगल कँसल आहे आणि त्यासाठी त्यांच्यावर रेडियोथेरेपी सुरू होती.

या ऑफ स्पिन अष्टपैलूने त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात १९५१ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटद्वारे केली होती. तेव्हा त्यांचे वय अवघे १९ वर्षे होते. प्रथं श्रेणी क्रिकेटमध्ये इलिंगवर्थ यांनी ७८७ सामने खेळले होते. ज्यामध्ये त्यांनी २८ च्या सरासरीने २४१३४ धावा केल्या होत्या. याबरोबरच २०७२ विकेट्सही घेतल्या होत्या. त्यांच्या नेतृत्त्वाखाली यॉर्कशायर संघाने सलग ३ वेळा काउंटीचे जेतेपद पटकावले होते. १९६६, १९६७ आणि १९६८ मध्ये यॉर्कशायर संघ काउंटी विजेता राहिला होता.

इंग्लंडला ऍशेसही दिलीय जिंकून
इलिंगवर्थ यांनी १९५८ ते १९७३ दरम्यान इंग्लंडच्या संघाचेही प्रतिनिधित्त्व केले होते. त्यांनी यादरम्यान ६१ कसोटी सामने खेळताना १८३६ धावा आणि १२२ विकेट्स घेतल्या होत्या. त्यांच्या नेतृत्त्वाखाली इंग्लंडच्या संघाने १९७०-७१ ची ऍशेस मालिकाही जिंकली होती. त्यावेळी संघाने मालिकेत २-० असा विजय मिळवला होता. कसोटीखेरीज वनडे क्रिकेटमध्येही ते इंग्लंडचा भाग राहिले होते. त्यांनी इंग्लंडकडून ३ वनडे सामने खेळताना ५ धावा आणि ४ विकेट्स घेतल्या होत्या.

इंग्लंड संघाचे प्रशिक्षकही राहिले होते इलिंगवर्थ
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही ते पूर्णपणे क्रिकेटपासून वेगळे झाले नव्हते. ते निवृत्तीनंतर बीबीसी टेलिव्हिजन कव्हरेज आणि सामना ब्रॉडकास्ट करणाऱ्या चॅनल्सचा भाग राहिले होते. याबरोबरच त्यांनी १९९५-९६ मध्ये इंग्लंड क्रिकेट संघाला प्रशिक्षण दिले होते. इतकेच नव्हे तर, इलिंगवर्थ हे १९९४ आणि १९९६ मध्ये इंग्लंडच्या निवड समितीचे अध्यक्षही राहिले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

पहिले कसोटी शतक, पहिला विजय अन् बरचं काही; द. आफ्रिकेशी जोडलेल्या आहेत द्रविडच्या खूप आठवणी

‘सिनीयर खेळाडूंना वगळले गेले, तरच त्यांना आपल्या स्थानाचे महत्त्व कळते’, द्रविड यांची रहाणेवर मोठी प्रतिक्रिया

एकीचे बळ! जेव्हा हरभजनवर आलेली बंदी, तेव्हा भारतीय संघाने दाखवलेला खंबीर पाठींबा, वाचा तो किस्सा

हेही पाहा-

विरोधी संघातील गोलंदाजांना Golden Watches भेट देणारा Captain|क्रिकेटर कमी राजकारणी जास्त असलेला Vizi

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---