इंग्लंड क्रिकेट संघ डिसेंबर महिन्यात पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ते तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून संघ आधीच जाहीर झाला आहे. या दौऱ्यात खेळाडूंबरोबर एक अशी व्यक्ती जाणार आहे, ज्याचा कोणीही विचार केला नसेल. इंग्लंड संघ या दौऱ्यावर एका शेफला (स्वयंपाकी) घेऊन जाणार आहे.
काही रिपोर्ट्सनुसार, ओमर मेझायने (omar meziane) हा शेफ इंग्लंडच्या संघासोबत पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. ज्याने इंग्लंडच्या राष्ट्रीय फुलबॉल संघासोबत काम केले आहे. झाले असे की, टी20 विश्वचषक सुरू होण्याआधी इंग्लडने सप्टेंबरमध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. तेव्हा त्या टी20 मालिकेदरम्यान संघातील अनेक खेळाडू आजारी पडले होते.
संघासोबत शेफ असल्याने खेळाडूंना हॉटेल आणि मैदानावरील अन्न खावे लागणार नाही. तसेच पहिल्यांदाचा इंग्लंडचा कसोटी संघ शेफसोबत दौरा करणार आहे.
टी20 विश्वचषकाआधी झालेल्या टी20 मालिकेत पाकिस्तानला 4-3 असे पराभूत व्हावे लागले. तसेच पाकिस्तानमधील जेवणाविषयी नाराजी अनुभवी फिरकीपटू मोईन अली यानेही दर्शवली. तो म्हणाला, कराचीमधील जेवण चांगले होते, मात्र लाहोरमधील काही खास नव्हते. आता इंग्लंडच्या या खेळीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कशी प्रतिक्रिया देते हे पाहण्याजोगे ठरेल.
इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) काही दिवसांत पाकिस्तानला रवाना होणार आहे. या मालिकेतील सामने रावळपिंडी, मुलतान आणि कराची येथे खेळले जाणार आहेत. सध्या इंग्लंडचे काही खेळाडू अबु धाबी येथे असून ते फॉर्मुला वन ग्रॅंड प्रिक्सचा आनंद घेत आहेत.
भारताच्या खेळाडूंविषयी पाहिले तर, सध्याचा टी20 कर्णधार हार्दिक पंड्या हा त्याच्या वैयक्तिक शेफला दौऱ्यावर जाताना सोबत नेतो. पंड्याचा डाएट मूग डाळ आणि तांदळाची खिचडी आहे, यासाठी त्याला खर्च येतो. मात्र, फिटनेसची काळजी घेण्यासाठी पाकिटातले काही पैसे जातील तर काय हरकत असे त्याचे म्हणणे होते. England cricket Team Tour Of Pakistan with chef
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट कोहलीचा जबरा फॅन किवी ओपनर! म्हणाला, ‘सूर्यासारखा फलंदाज…’
सूर्या भारताकडून खेळणार हे रोहितला 11 वर्षांपूर्वीच समजलेलं! ‘हिटमॅन’चं ‘ते’ ट्वीट व्हायरल