इंग्लंड क्रिकेट संघाचा फलंदाज जेम्स विन्स (James Vince) याच्यासोबत अत्यंत धक्कादायक प्रकार घडलेला आहे. दोन वेळा त्याच्या घरावर हल्ला (Attack On James Vince) झाल्याने आता त्याला आपले राहते घर सोडावे लागले. त्याने स्वतः याबाबत माहिती दिली आहे.
जेम्स याने नुकतीच एक पोस्ट करत त्याला कोणीतरी जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचे म्हटले. मागील तीन महिन्याच्या काळात दोनदा त्याच्या घरावर हल्ला करण्यात आला असून, त्याचे यामध्ये नुकसान झाले आहे. या कारणाने त्याने आपले शहर असलेल्या साऊथॅम्टनमधून आपले बस्तान हलवले.
जेम्स याने खुलासा केला की, 1 मे 2024 रोजी काही लोक त्याच्या घरात घुसले व सामानाची तोडफोड करत होते. त्यावेळी जेम्स जागा असल्याने तो आपल्या पत्नी व मुलांना घेऊन पळाला होता. त्यानंतर आता घराची दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा त्याच्या घरावर असाच हल्ला झाला. दोन व्यक्तींनी त्याच्या गाडीवर विटा फेकत गाडीच्या काचा सीसीटीव्हीमध्ये हे प्रकरण कैद झाले असून, पोलीस तपास करत आहेत.
जेम्स याचे कोणाशीही वाद नाहीत. मात्र, पूर्ववैमनस्यातून अथवा आर्थिक व्यवहाराच्या देवाणघेवाणीतून हे हल्ले होत असावेत असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक झाली नसून, लवकरच गुन्हेगारांचा शोध घेतला जाईल असे पोलिसांनी म्हटले आहे. जेम्स याने लोकांना आवाहन केले आहे, की या प्रकरणी कोणाला काहीही माहित असेल तर त्वरित पोलिसांशी संपर्क करावा.
This footage supplied by Hampshire captain James Vince is of an unprovoked attack on his home.
Vince’s property was vandalised on two separate occasions (April 15 and May 11) forcing his family out.
He is appealing for anyone with information to go to Hampshire Police. pic.twitter.com/Oct9BDTocb
— Alfie House (@AlfieHouseEcho) July 16, 2024
जेम्स याने इंग्लंडसाठी आतापर्यंत 13 कसोटी, 25 वनडे व 17 टी20 सामने खेळले आहेत. तो काऊंटी क्रिकेटमध्ये हॅम्पशायर संघाचे नेतृत्व करतो. इंग्लंडने 2022 मध्ये जिंकलेल्या टी20 विश्वचषक विजेत्या संघाचा तो सदस्य होता. मात्र, मागील जवळपास वर्षभरापासून तो कोणत्याही प्रकारचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नाही. असे असले तरी जगभरातील टी20 लीगमध्ये तो सातत्याने दिसून येतो.
महत्वाच्या बातम्या-
ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकीचा सुवर्ण इतिहास, जाणून घ्या आतापर्यंत किती पदकं जिंकली
IND VS SL: कर्णधार म्हणून सूर्याचीच हवा, तर हार्दिक पांड्या जवळपासही नाही, पाहा कॅप्टन म्हणून दोघांची कामगिरी
टीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी श्रीलंकेच्या माजी कर्णधाराची गोळ्या झाडून हत्या