रोहित शर्मा नंतर टी20 मध्ये भारतीय संघासाठी नियमित कर्णधार कोण बनणार याची उत्सुक्ता शिगेला पोहचली आहे. टी20 विश्वचषकाच्या अदभूत यशानंतर रोहित शर्माने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घोषित केले होते. वास्तविक, यंदाच्या टी20 विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हार्दिक पांड्या टीम इंडियाचा उपकर्णधार होता. टीम इंडिया विश्वविजेत्या बनवण्याच्या भूमिकेत हार्दिक पांड्याने म्हत्वाचे योगदान दिले आहे. दरम्यान आगमी श्रीलंका दाैऱ्यासाठी निवड समिती हार्दिक पांड्याच्या फिटनेस आणि वर्कलोड मॅनेजमेंटमुळे कर्णधारपदासाठी नापसंती असल्याचे म्हटंले जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, निवड समिती भारतीय संघाच्या टी20 मध्ये हार्दिक पांड्याच्या जागी सूर्यकुमार यादवची कर्णधारपदासाठी 2026 पर्यंत नेमणूक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान गंभीर आणि आगरकरने काल (16 जुलै) संध्याकाळी हार्दिक पांड्याशी आगामी प्लॅन्सबद्दल चर्चा केली होती. दरम्यान, त्याने अनुभवी अष्टपैलू खेळाडूला सांगितले आहे की संघात स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी आणि दीर्घकालीन पर्यायाला अंतिम रूप देण्यासाठी हे पाऊल उचलण्याचा विचार केला जात आहे.
अश्या परिस्थितीत जाणून घेऊयात हर्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्यतील टी20 करिअरमधील कर्णधार म्हणून कसे आहेत.
हार्दिक पांड्या
भारतीय संघाचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याने आतापर्यंत 16 सामन्यात संघाचे नेतृत्व केले आहे. ज्यामध्ये त्याला 10 सामन्यात विजय मिळाले आहे. तर 5 सामन्यात पराभवास सामोरे जावे लागले आहे. तर एक सामना अनिर्णित राहिला. हार्दिकच्या नेतृत्वात टीम इंडिया न्यूझीलंड आणि श्रीलंका विरुद्ध टी20 मालिका जिंकली आहे. तर वेस्ट इंडिज विरुद्ध एक मालिका गमावली देखील आहे. कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याच्या कामगिरीबीबत बोलायचे झाले तर, त्याने 26.90 च्या सरासरीने 292 धावा केल्या आहेत. तर 26.50 च्या सरासरीने 12 विकेट्स घेतल्या आहेत.
सूर्यकुमार यादव
भारतीय संघासठी सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. सूर्याने आतापर्यंत 8 सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले असून 5 सामन्यात विजय मिळाले आहे तर 2 सामन्यात त्याला पराभवाला सामेरे जावे लागले आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. सूर्यकुमार यदवच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताने 4-1 ने टी20 मालिका जिंकली तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या 7 सामन्यात 42.50 च्या सरासरीने 300 धावा केल्या आहेत. ज्यमध्ये एक शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्तवाच्या बातम्या-
टीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी श्रीलंकेच्या माजी कर्णधाराची गोळ्या झाडून हत्या
निवड समितीसाठी टी20 मध्ये हार्दिक पांड्या कर्णधार म्हणून का नको? मोठे कारण उघड
“तो दिवस आठवून आज ही…”, कोहलीशी केलेल्या स्लेजिंगबबात ऑस्ट्रेलियन कर्णधाराने सांगितला किस्सा