इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना हेडिंग्लेच्या मैदानावर सुरू आहे.हा सामना जिंकून भारतीय संघ विजयी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु, सुरुवातीलाच इंग्लंडच्या दिग्गज गोलंदाजाने भारतीय संघाला मोठे धक्के दिले. ज्यानंतर प्रेक्षकांनी ही टाळ्या वाजवून दिग्गज गोलंदाजाचे कौतुक केले आहे.
भारतीय कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला आहे. सामन्याच्या सुरुवातीलाच इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन याने भारतीय संघातील ३ मुख्य फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
जेम्स अँडरसनने पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर मागच्या सामन्यातील शतकवीर केएल राहुलला भोपळाही न फोडता माघारी धाडले. त्यानंतर फलंदाजीला आलेला चेतेश्वर पुजारा या सामन्यात देखील पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्याला पाचव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर जेम्स अँडरसनने माघारी धाडले. पूजाराला बाद केल्यानंतर मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी उभा राहून टाळ्या वाजवून जेम्स अँडरसनचे कौतुक केले. अँडरसनने पुजाराला १० व्यांदा बाद केले आहे.
जेम्स अँडरसन हा ३९ वर्षांचा असला तरी देखील त्याच्या गोलंदाजीतील गती आणि धार काही कमी झाली नाही. त्यानंतर अकराव्या शेवटच्या चेंडुवर त्याने कर्णधार विराट कोहलीला देखील बाद करत माघारी धाडले.(England fans applause James Anderson after taking Cheteshwar pujara wicket)
The Greatest doing his thing! ????
Scorecard/Videos: https://t.co/UakxjzUrcE
???????????????????????????? #ENGvIND ???????? pic.twitter.com/o763wNelaG
— England Cricket (@englandcricket) August 25, 2021
भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो
भारतीय संघातील सलामीवीर फलंदाजांनी पहिल्या २ कसोटी सामन्यात चांगली सुरुवात करून दिली होती. परंतु तिसऱ्या कसोटी सामन्यात सलामीवीर फलंदाज चांगली सुरुवात करून देण्यास अपयशी ठरले आहेत.जेम्स अँडरसनने पहिल्याच षटकात केएल राहुलला ० धावांवर माघारी धाडले. त्यानंतर पाचव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर जेम्स अँडरसनने चेतेश्वर पुजाराला माघारी धाडले. तसेच अँडरसनने कोहलीला ७ धावांवर माघारी धाडले. त्यानंतरही कोणी फारशी चांगली कामगिरी करु शकले नाहीत.
भारताकडून केवळ रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या दोघांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. रोहितने १९ धावा केल्या, तर रहाणेने १८ धावा केल्या. अन्य कोणालाही दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि क्रेग ओव्हरटनने सर्वाधिक प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तर, सॅम करन आणि ऑली रॉबिन्सनने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
हेडिंग्ले कसोटीसाठी इंग्लंडचा संघ-
रॉरी बर्न्स, हसिब हमीद, डेव्हिड मलान, जो रूट (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जोस बटलर ओली रॉबिन्सन, मोईन अली, सॅम करन, क्रेग ओव्हरटन व जेम्स अँडरसन
हेडिंग्ले कसोटीसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज व इशांत शर्मा.
महत्त्वाच्या बातम्या –
अरे कोहली, तुला नेमकं झालंय काय? ‘रनमशीन’बाबत ही गोष्ट वाचून हैराण व्हाल
‘पाकिस्तानचे टी२० विश्वचषक अंतिम सामन्यात पोहोचणेही अवघड,’ पाक दिग्गजाचेच वक्तव्य
मेल व्हर्जन ऑल मिराबाई चानू!! वेटलिफ्टिंगचा व्हिडिओ शेअर करताच कोहली भयंकर ट्रोल