यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) पाकिस्तान संघ त्यांचा साखळीफेरीतील अखेरचा सामना होण्यापूर्वीच, सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्याच्या रेसमधून बाहेर पडला. पाकिस्तान संघाची धुरा बाबर आझमकडे होती. परंतु त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान तीन सामन्यात एकच सामना जिंकू शकला. तत्पूर्वी इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनी बाबर आझमवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांना वाटत आहे की बाबर आझम टी20 साठी फीट नाही. त्याला वेस्ट इंडिज संघात देखील जागा मिळणार नाही.
क्रिकबझशी बोलताना मायकल वाॅन म्हणाले, “पाकिस्तान हवामानाला दोष देऊ शकत नाही. त्यांना भारत आणि अमेरिका संघाला हारवायचं होतं. त्यांनी तसं केलं असतं तर सुपर 8 साठी क्वालिफाय झाले असते. यावेळी मी पाकिस्तानला एक टी20 संघ म्हणून बघत नाही. जरी त्यांनी शेवटच्या टी20 विश्वचषकात फायनलमध्ये जागा केली असली तरी ते या फारमॅटसाठी योग्य नाहीत. मला वाटत नाही की त्यांचा यावेळचा संघ चांगला होता. यांनीही तेच केलं जे पाकिस्तान संघ आतापर्यंत करत आला आहे.”
पाकिस्तान संघाला यंदाच्या टी20 विश्वचषकात यजमान अमेरिका संघाकडून सुपर ओव्हरमध्ये लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर भारतीय संघानं त्यांचा धुव्वा उडवला. भारताविरुद्ध पाकिस्तान संघ 120 धावांचं आव्हान देखील गाठू शकला नाही. आयर्लंड विरुद्ध अमेरिका सामना पावसानं खोळंबा घातल्या कारणानं रद्द झाला. त्यामुळे दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आला. या सामन्यावर पाकिस्तानच्या सुपर 8 मध्ये पोहचण्याच्या आशा होत्या. परंतु पावसानं त्यांच्या आशा संपुष्टात आणल्या.
इंग्लंडच्या माजी कर्णधारानं बाबर आझमच्या खेळण्याच्या शैलीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, “मी गेल्या काही महिन्यापासून जेवढं क्रिकेट पाहिलं आहे, मला वाटत नाही की पाकिस्तानमध्ये टी20 क्रिकेट खेळण्याची क्षमता आहे. खरं सांगायचं तर मला वाटत नाही की या संघात टी20 फॉरमॅटमध्ये फार चांगले खेळाडू आहेत. बाबर आझम हा अतिशय शानदार खेळाडू आहे पण तो इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत किंवा वेस्ट इंडिजच्या टी20 संघात स्थान मिळवू शकेल का? यावर माझे उत्तर असेल, कदाचित नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत विरुद्ध कॅनडा सामन्यावर पावसाचं सावट! पाहा हवामान अंदाज
कोण आहे इरफान पठाणची पत्नी सफा बेग? वयाच्या 21 व्या वर्षीच केले होते लग्न
धक्कादायक! माझी सर्व कमाई दान करणार; टी20 विश्वचषकादरम्यान रिषभ पंतने दिले वचन