fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

इंग्लंडकडून ५ हजार धावा, आर्सेनलकडून १६ गोल करणारा अवलिया माॅडेल

England Former Cricketer Denis Compton Birthday Special

पुर्वी क्रिकेट क्षेत्रात इंग्लंड संघाला सर्वात प्रबळ आणि मजबूत संघ समजले जात असायचे. अशा संघातील डेनिस कॉम्पटन या महान क्रिकेटपटूचा आजच्या दिवशी म्हणजेच २३ मे १९१८ला मिडलसेक्समधील हेंडन येथे जन्म झाला होता. ते केवळ उत्कृष्ट फलंदाज नव्हते तर तेवढेच चांगले गोलंदाजही होते. त्याबरोबरच डेनिस यांनी फुटबॉल क्षेत्रातही आपली ओळख निर्माण केली होती. England Former Cricketer Denis Compton Birthday Special

डेनिस यांची क्रिकेट क्षेत्रातील कामगिरी दुसऱ्या महायुद्धानंतर (१९४५) उंचावली होती. त्यांनी १९३७ ते १९५७ या काळात इंग्लंडकडून ७८ कसोटी सामने खेळले होते. दरम्यान त्यांनी ५०.०६च्या सरासरीने ५८०७ धावा केल्या होत्या. यात त्यांच्या १७ शतकांचा समावेश होता. ज्यातील १३ शतके त्यांनी इंग्लंडच्या मैदानावर ठोकली होती.

महत्त्वाचे म्हणजे, डेनिस यांना भारतीय संघाविरुद्ध एकही शतक करता आले नव्हते. उजव्या हाताच्या या फलंदाजाने १९५४ला ट्रेंट ब्रिज मैदानावर कसोटी कारकिर्दीतील सर्वाधिक वैयक्तिक २७८ धावा केल्या होत्या.

डेनिस हे केवळ आंतरराष्ट्रीत सामन्यात झळकले नव्हते. तर त्यांची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीही उल्लेखनीय होती. त्यांनी २८ वर्षांच्या देशांतर्गत कारकिर्दीत ५१५ प्रथम श्रेणी सामन्यात ३८९४२ धावा केल्या होत्या. एवढेच नव्हे तर, त्यांनी ६२२ विकेट्सही घेतल्या होत्या.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवण्यापुर्वी डेनिस यांनी फूटबॉल क्षेत्रातही नावलौकिक मिळवला होता. त्यांनी १९३४-३५ दरम्यान ननहेड क्लबकडून फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या प्रभावशाली कौशल्यामुळे त्यांना लवकरच फुटबॉलच्या प्रसिद्ध आर्सेनल क्लबकडून मिडफिल्डर म्हणून खेळण्याची संधी मिळाली. डेनिस यांनी अर्सेनल फुटबॉल क्लबचा भाग बनत संघाला १९४८मध्ये विजेतेपद मिलवून दिले होते. शिवाय त्यांनी १९५०मध्येही एफए चषक पटकावले होते.

अशा या सर्वगुणी डेनिस यांनी क्रिडा क्षेत्राव्यतिरिक्त जाहिरातीमध्ये मॉडेलिंगदेखील केले होते. ते एका हेयर जेल कंपनीचे प्रसिद्ध ब्रँड ऍंम्बेसिडर होते. अशा या महान व्यक्तिने त्याच्या घवघवीत यशासह २३ एप्रिल १९९७ला जगाला निरोप दिला होता.

ट्रेंडिंग घडामोडी-

७०च्या दशकात या भारतीय गोलंदाजाची होती भलतीच दहशत, आजही विक्रम आहेत अबाधित

विरोध केला, पण देशाचे वाचवले तीन अब्ज रुपये

लाॅकडाऊननंतर सराव करणारे ‘ते’ दोघे ठरले जगातील पहिले आंतरराष्ट्रीय…

You might also like