fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

लाॅकडाऊननंतर सराव करणारे ‘ते’ दोघे ठरले जगातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू

Stuart Broad and First Cricketer to Start Training for England

नॉटिंघम । कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी झाल्यानंतर इंग्लंडचे गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस वोक्स गुरुवारी (२१ मे) सराव करणारे पहिले क्रिकेटपटू बनले. ब्रॉडने नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिजवर तर वोक्सने बर्मिंगहमच्या एजबॅस्टन मैदानावर धावण्याचा सराव केला.

इंग्लंडसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा ब्रॉडचा (Stuart Broad) समावेश त्या १८ गोलंदाजांमध्ये आहे, ज्यांना इंग्लंड आणि वेल्सच्या ७ वेगवेगळ्या मैदानावर वैयक्तिक सत्रासाठी निवडले आहे.

स्काय स्पोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, बेन स्टोक्सनंतर (Ben Stokes) इंग्लंडचा सर्वोत्तम अष्टपैलू वोक्सने (Chris Woakes) खुलासा केला आहे. तो म्हणाला की, त्यानेदेखील प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे. कोरोना व्हायरसदरम्यान गोष्टी पूर्वीप्रमाणे सामान्य नव्हत्या.

ब्रॉडने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून प्रशिक्षणाच्या दिवसाची सर्व माहिती चाहत्यांना दिली. यामध्ये त्याने स्वत:चा एक फोटो शेअर केला. या फोटोत तो आपल्या घरात डिजीटल थर्मामीटरच्या सहाय्याने तापमान मोजत आहे. तसेच त्यानंतर त्याने एका ऍपमार्फत याचा निकाल अपलोड केला.

यानंतर तो आपले प्रशिक्षण साहित्य सॅनिटाईज करून ट्रेंट ब्रिजवर पोहोचला. त्याला कार पार्किंगसाठी ठरवलेली जागा दिली होती. तसेच तो थेट खेळाडूंसाठी असलेल्या सेफ्टी प्रोटोकॉल अंतर्गत खेळपट्टीवर पोहोचला. त्याला ड्रेसिंग रूममध्ये कपडे बदलण्याची परवानगी नव्हती. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने वेगवान गोलंदाजांना चेंडूचे वेगवेगळे सेट दिले होते. त्याने याबरोबरच खेळपट्टीवर एकट्याने गोलंदाजी करण्यास सुरुवात केली. यादरम्यान कोणताही फलंदाज किंवा यष्टीरक्षक मैदानावर उपस्थित नव्हता. त्यावेळी केवळ एक फिजिओ तिथे होते, ते कॅमेरामनचे कामही करत होते.

ब्रॉडने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर लिहिले की, “प्रशिक्षणासाठी खूप काही करण्यात आले आहे. इंग्लंड क्रिकेट आणि ट्रेंट ब्रिजच्या सर्व लोकांचे धन्यवाद, ज्यांच्यामुळे हे शक्य झाले. गोलंदाजी केल्यामुळे खूप चांगले वाटले. खूप मजा आली.”

जागतिक साथ रोगाच्या संकटामुळे इंग्लंडमध्ये मार्चच्या मध्यापर्यंत क्रिकेटचे सर्व कार्यक्रम १ जुलैपर्यंत बंद करण्यात आले आहेत. तर इतर देशांमध्ये क्रिकेटवर पूर्वीपासूनच स्थगित करण्यात आले आहेत.

कोरोना व्हायरस असला तरीही इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (England and Wales Cricket Board) वेस्ट इंडीजविरुद्ध ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेचे आयोजन करण्याची योजना बनवत आहेत. ही मालिका यापूर्वी जून महिन्यात होणार होती.

ट्रेंडिंग घडामोडी-

लॉर्ड्सनंतर ‘दादा’ दिसला आता आणखी एका बाल्कनीत; पण तो नक्की करतोय तरी काय?…

-२०१९ विश्वचषक पराभवाचे खापर गौतम गंभीरने फोडले या लोकांवर

-कसोटीत वेगवान त्रिशतक करणारे ५ क्रिकेटपटू

You might also like