fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

लॉर्ड्सनंतर ‘दादा’ दिसला आता आणखी एका बाल्कनीत; पण तो नक्की करतोय तरी काय?…

Sourav Ganguly picture goes Viral Fixing the Mango Tree from Balcony

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला कदाचित बालकनीवर अधिकच प्रेम आहे. तसेच काही चाहत्यांना तर असे वाटते की, ही लव्ह स्टोरी वीर-झारापेक्षाही चांगली आहे.

कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) गांगुलीलाही आपल्या आपल्या घरात वेळ घालवत आहे. गांगुली आपल्या घराच्या बालकनीमध्ये उभे राहून आंब्याचे झाड ओढले आणि ते पुन्हा योग्य जागी उभे केले.

गांगुलीने (Sourav Ganguly) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून झाड ओढतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत त्याने लिहिले की, “अंगणातील आंब्याचे झाड उचलणे गरजेचे होते. ते वर उचलले आणि पुन्हा आपल्या जागी बसवण्यात आले.”

खरंतर अम्फान वादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये खूप हानी झाली. कोलकातामध्येही या वादळाने खूप नुकसान केले.

गांगुलीने शेअर केलेल्या या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पडला. अनेक चाहत्यांनी बालकनीच्या या फोटोला लॉर्ड्सच्या (Lords) नेटवेस्ट ट्रॉफीशी जोडून कमेंट करणे सुरु केले.

 

१३ जुलै २००२मध्ये युवराज सिंग (Yuvraj Singh) आणि मोहम्मद कैफच्या (Mohammad Shami) शानदार कामगिरीमुळे भारताने इंग्लंडला पराभूत करत नेटवेस्ट ट्रॉफी (NetWest Trophy) जिंकली होती. भारतीय संघ अडचणीत होता, तेव्हा या दोघांनी संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचे काम केले होते.

त्यावेळी तत्कालीन कर्णधार गांगुलीने लॉर्ड्सच्या बालकनीमध्ये आपला शर्ट काढून हवेत फिरवला होता. तसेच अशा अंदाजात त्याने आनंद साजरा केला होता.

आपल्या अनेक मुलाखतीत गांगुलीने म्हटले आहे की, त्याला या घटनेवर कोणताही पश्चात्ताप नाही. तरीही नुकतेच त्याने म्हटले होते की, “त्याच्या मुलीने हा व्हिडिओ पाहून त्याला म्हटले होते की, तुम्ही हे काय करत होता?, त्यावर त्याला थोडीशी लाज वाटली होती.”

ट्रेंडिंग घडामोडी-

-आयपीएलचे यश या ऑस्ट्रेलियन खेळाडूला खुपले; म्हणतो, आयपीएल तर पैसा कमवायचा धंदा

-२०१९ विश्वचषक पराभवाचे खापर गौतम गंभीरने फोडले या लोकांवर

-कसोटीत वेगवान त्रिशतक करणारे ५ क्रिकेटपटू

You might also like