Kevin Pietersen On Rohit And Virat Future: टी20 विश्वचषक 2024 स्पर्धा सुरू होण्यासाठी अजून बरेच महिने बाकी आहेत. मात्र, त्यापूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन याने भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विस्फोटक फलंदाज विराट कोहली यांच्याविषयी मोठे विधान केले आहे. त्याला वाटते की, रोहित आणि विराट यांच्याकडे आगामी टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्याची संधी आहे. भारतीय क्रिकेट सेटअपमध्ये प्रतिभेची खोली पाहता, वनडे विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर, रोहित आणि विराटच्या भविष्याविषयी मोठी चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, या दोघांनीही विश्वचषकात प्रभावी प्रदर्शन केले आहे.
टी20 विश्वचषक 2024 खेळणार रोहित आणि विराट?
केविन पीटरसन (Kevin Pietersen) याने याविषयी बोलताना म्हटले की, आयपीएल 2024 (IPL 2024) स्पर्धेतील त्यांचे प्रदर्शन पुढील वर्षी जून मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेतील त्यांच्या निवडीवर महत्त्वाची भूमिका निभावेल. पीटरसन म्हणाला, “रोहित आणि विराटकडे अनेक संधी आहे. त्यांना पाहावे लागेल की, ते आयपीएलमध्ये कसे प्रदर्शन करतात. निवडकर्त्यांना त्यांना आयपीएलमध्ये पाहावे लागेल. कारण, ते भारतीय क्रिकेटचे दिग्गज आहेत.”
टी20 विश्वचषक नाही दूर
रविवारी (दि. 26 नोव्हेंबर) आयपीएलच्या सर्व 10 फ्रँचायझींनी एकूण 173 खेळाडू रिटेन केले. रोहित आणि विराटला अनुक्रमे मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने रिटेन केले. पीटरसन म्हणाला, “आयपीएल 2024 आणि पुढील वर्षीच्या टी20 विश्वचषकामध्ये जास्त अंतर नाही. टी20 विश्वचषक जून 2024मध्ये खेळला जाणार आहे. त्यासाठी ही काही खेळाडूंसाठी मोठी संधी असू शकते.”
रोहित शर्मा आणि विराट कोहली (Rohit Sharma And Virat Kohli) यांनी विश्वचषक 2023 स्पर्धेत बॅटमधून चांगली कामगिरी केली होती. विराटने 11 सामन्यात सर्वाधिक 765 धावा केल्या होत्या. यामध्ये 3 शतके आणि 6 अर्धशतकांचा समावेश होता. तसेच, रोहितने 11 सामने खेळताना 1 शतक आणि 3 अर्धशतकाच्या जोरावर 597 धावा केल्या होत्या. (england former cricketer kevin pietersen big statement on rohit sharma and virat kohli future ahead of t20 world cup 2024)
हेही वाचा-
‘रोहितच्या जागी मी कर्णधार असतो, तर 100 वेळा…’, WC Finalमध्ये संघात जागा न मिळण्याबद्दल अश्विनचे भाष्य
IPL 2024मधून बाहेर पडलेल्या ‘या’ खेळाडूच्या गुडघ्याची सर्जरी, फोटो पाहिला का?