---Advertisement---

इंग्लंड सरकारचा मोठा निर्णय, दौर्‍यावर येणार्‍या भारतीय खेळाडूंना दिली ‘ही’ सूट

On: मंगळवार, जून 1, 2021 6:15 PM
---Advertisement---

भारतीय पुरुष आणि महिला संघ येत्या जून महिन्यात इंग्लंडच्या दौर्‍यावर जाणार आहे. मात्र कोरोनाचा धोका अद्याप कायम असल्याने कडक नियमावलीचे दोन्ही संघांना पालन करावे लागणार आहे. इंग्लंडला उड्डाण घेण्यापूर्वी देखील दोन्ही संघांना विलगीकरण पूर्ण करायचे आहे. तर इंग्लंडमध्ये गेल्यावर देखील दहा दिवसांचे विलगीकरण पूर्ण करणे त्यांना बंधनकारक आहे.

याच अंतर्गत दोन्ही संघ सध्या मुंबईतील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. दोन्ही संघातील खेळाडूंसह काही खेळाडूंच्या परिवारातील सदस्य देखील त्यांच्यासह राहत आहेत. मात्र इंग्लंड सरकारने लादलेल्या नियमांमुळे त्यांना दौर्‍यावर खेळाडूंसह प्रवास करता येईल की नाही, याबाबत संदिग्धता होती. मात्र आता याबाबत इंग्लंड सरकारने निर्णय जाहीर केला आहे.

इंग्लंड सरकारने खेळाडूंसह परिवाराला देखील दौर्‍यावर प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. कोरोना विषाणूमुळे दुसर्‍या देशातील नागरिकांच्या प्रवासावर इंग्लंडच्या सरकारने निर्बंध लादले होते. अशा परिस्थितीत खेळाडूंना परवानगी मिळाली असली तरी परिवाराला ही परवानगी दिल्या जाईल अथवा नाही, याबाबत साशंकता होती. मात्र दीर्घकालीन दौरा लक्षात घेऊन आता इंग्लंड सरकारने ही परवानगी दिली आहे. त्यामुळे आता मुंबईतील विलगीकरण पूर्ण करून दोन्ही संघ चार्टर्ड विमानाने इंग्लंडला रवाना होतील. मात्र इंग्लंडमध्ये पोहोचल्यावर देखील दहा दिवसांचे सक्त विलगीकरण पूर्ण करणे त्यांना बंधनकारक असेल. साऊथम्पटनच्या मैदानाजवळील हॉटेलमध्ये महिला आणि पुरुष संघ हा कालावधी व्यतीत करतील.

या दौर्‍यावर भारतीय पुरुष संघ संघ सर्वप्रथम विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडशी दोन हात करेल. त्यानंतर इंग्लंड संघाशी पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. तर दुसरीकडे महिला संघ सर्वप्रथम ब्रिस्टल मध्ये इंग्लंड संघाशी एकमेव कसोटी सामन्याची मालिका खेळेल. आणि त्यानंतर तीन वनडे आणि तीन टी२० सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडशी दोन हात करेल.

महत्त्वाच्या बातम्या –

काय सांगता!! या महत्त्वाच्या कसोटी मालिकेतून न्यूझीलंडचा दिग्गज गोलंदाज ट्रेंट बोल्ट बाहेर

‘चिन्ना थाला’ सुरेश रैनाचा लुंगीमध्ये खास अंदाज; सोशल मीडियावर व्हिडिओचा धुमाकूळ

ब्रेकिंग! मुंबई क्रिकेट संघाला मिळाला ‘नवा महागुरु’, ३३ शतके करणाऱ्या दिग्गजाची नियुक्ती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---