इंग्लडच्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची चांगली संधी आहे. २०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताकडून इंग्लंडला हार पत्करावी लागली होती. इंग्लंडने आता पर्यंत दोन वेळा अंतिम सामान्यापर्यंतची मजल मारली आहे, पण त्यांना आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकता आलेली नाही. या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी इंग्लंड आणि वेल्समध्ये होणार आहे. घरच्या मैदानाचा आणि फॅन्सच्या सपोर्टचा फायदा घेत इंग्लंड या वर्षी तरी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणार का यावर सर्व क्रिकेट जगाच लक्ष लागलं आहे.
इंग्लंडच्या संघाची ताकद –
अष्टपैलू – बेन स्टोक्स , मोईन अली आणि क्रिस वोक्स यांच्या सारख्या फलंदाजी आणि गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंचा भडीमार इंग्लंडच्या संघात आहे.
टॉप ४ – इंग्लंडच्या टॉप ४ हे चॅम्पियन्स ट्रॉफीमधल्या कुठल्याही संघाच्या गोलंदाजीवर भारी पडेल असा आहे. रॉय, हेल्स मॉर्गन आणि रूट यांमुळे इंग्लंडचा संघ भक्कम दिसत आहे.
इंग्लंड संघातील कमतरता
नेतृत्व : मॉर्गनच्या नेतृत्व खाली संघाने जरी चांगली कामगिरी केली आली तरी या संघाने कुठलीही मोठी स्पर्धा जिंकली नाही. त्यामुळे या संघाला घेऊन मॉर्गन या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कुठवर मजल मारतो या वर सर्वांचंच लक्ष असेल.
महास्पोर्ट्सची भविष्यवाणी – अंतिम फेरी
२०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामान्यपर्यंत धडक मारल्यानंतर आता इंग्लंडचे लक्ष ट्रॉफी जिंकण्यावर असेल. या संघेचे नेतृत्व जरी मॉर्गन करत आला तरी सर्वांचे लक्ष बेन स्टोक्सवर असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ :
फलंदाज – रॉय, हेल्स, रूट, मॉर्गन, बिलिंग्स
अष्टपैलू – स्टोक्स, अली, वोक्स
यष्टीरक्षक – बटलर, बेस्टो
फिरकी गोलंदाज – रशीद खान
वेगवान गोलंदाज – प्लंकेट, विली, बॉल, वूड
दक्षिण आफ्रिकेचे सामने –
जून १ इंग्लंड विरुद्ध बांगलादेश
जून ६ इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड
जून १० इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रलिया