नुकतीच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिका बरोबरीत सुटली. मागच्या वेळी ऍशेस जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ही ट्रॉफी यावेळीही रिटेन केली. शेवटच्या कसोटी सामन्यानंतर दोन दिवसांनी दोन्ही संघांना आयसीसीकडून धक्का बसला. दोन्ही संघांवर आयसीसीने षटकांची गती न राखल्यामुळे दंड ठोठावला आहे.
आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) तिसऱ्या हंगाम नुकताच सुरू झाला. मागच्या वेळचे विजेतेपद भारताला पराभूत करून ऑस्ट्रेलियाने जिंकले. डब्ल्यूटीसीच्या नव्या हंगामाला सुरूवात होण्यापूर्वीच आयसीसीने षटकांची गती न राखण्यासंदर्भातील नियमांमध्ये बदल केला. ऍशेस 2023 (Ashes 2023) साठी हाच नवा नियम लागू करण्यात आला होता. नव्या नियमानुसार निर्धारित वेळेपेमध्ये जितक्या षटकांचा खेळ कमी होईल, त्या प्रत्येक षटकासाठी सामना शुल्काच्या पाच टक्के रक्कम कापली जाईल. संघाच्या सामना शुल्कापैकी जास्तित जास्त 50 टक्के रक्कम कापली जाऊ शकते. सोबतच एका षटकासाठी एक गुण देखील कापला जाणार आहे. ऍशेसे मालिका संपल्यानंतर आयसीसीने ऑस्ट्रेलियाचे 10, तरत इंग्लंडचे 19 गुण कापले आहेत.
डब्ल्यूटीसी गुणतालिकेत एखाद्या संघाला विजयानंतर 12 गुण मिळतात. तसेच सामना अनिर्णित झाल्यानंतर संघाला 4 गुण मिळतात. पराभूत झाल्यानंतर मात्र त्या संघाला एकही गुण मिळत नाही. एजबस्टन कसोटीत इंग्लंडने निर्धारित वेळेपेक्षा 2 षटके कमी टाकली होती. लॉर्ड्सवर त्यांच्या संघाने 9 षटके कमी टाकली, ओल्ड ट्रेफर्डमध्ये तीन षटके, तर द ओव्हलवर पाच षटके इंग्लंड संघाकडून कमी टाकली गेली. परिणामी संघाला 19 गुणांचा फटका बसला आहे.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघाचा विचार केला, तर पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील गोलंदाजी आक्रमानाने इंग्लंडच्या तुलनेत कमी नुकसान सोसले आहे. मॅनचेस्टर कसोटीत ऑस्ट्रेलियाचने निर्धारित वेळेपक्षा 10 षटके कमी टाकली होती, ज्यासाठी त्यांचे 10 गुण कापले गेले. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाच्या सामना शुल्कापैकी 50 टक्के रक्कम कापली गेली. तर दुसरीकडे इंग्लंड संघाला पहिल्या कसोटीत 10 टक्के, दुसऱ्या कसोटीत 45 टक्के, चौथ्या कसोटीत 15 टक्के, तर पाचव्या कसोटीत 25 टक्के सामना शुल्काचा दंड भरावा लागला आहे. डब्ल्यूटीसी गुणतालिकेत पाकिस्तान संघ सद्या 100 गुणांसह पहिल्या, भारत 66.67 गुणांसह दुसऱ्या, ऑस्ट्रेलिया 30 गुणांसह तिसऱ्या, वेस्ट इंडीज 16.67 गुणांसह तिसऱ्या आणि इंग्लंड 15 गुणांसह पाचव्या कर्मांकावर आहे.
WTC 2023-25 Points table:
1) Pakistan – 100%
2) India – 66.67%
3) Australia – 30%
4) West Indies – 16.67%
5) England – 15% pic.twitter.com/sQAo8iQ1zP— Johns. (@CricCrazyJohns) August 2, 2023
उभय संघांतील या मालिकेच पहिले दोन सामने पाहुण्या ऑस्ट्रेलियाने जिंकले होते. तिसरा आणि पाचवा सामना मात्र यजमान इंग्लंडने नावावर केला. मालिकेतील चौथा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. (England has lost 19 points & Australia has lost 10 points due to slow over-rate in WTC during Ashes.)
महत्वाच्या बातम्या –
वनडे विश्वचषकात निवडले नाही तर शार्दुल काय करणार? वेगवान गोलंदाजाने स्वतःच सांगितले
दुसऱ्या वनडे वॉटरबॉय, तर तिसऱ्या वनडेत अचानक फिल्डर बनला विराट, सामना पाहणाऱ्यांमध्ये झपाट्याने वाढ