---Advertisement---

अजिंक्य रहाणने ऐन वेळी सोडली संघाची साथ, पुढचे दोन महिने करणार ‘हे’ काम

Ajinkya Rahane
---Advertisement---

भारतीय संघाचा दिग्गज अजिंक्य रहाणे मोठ्या काळानंतर कसोटी संघात स्थान बनवू शकला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने महत्वपूर्ण खेळी केली. पण संघाला विजय मिळवून देता आला नाही. वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेतही रहाणेची बॅट शांत होती. वेस्ट इंडीज दौरा नुकताच संपवून तो मायदेशी परतला असून मोठा निर्णय घेतल आपल्या संघाला धक्का दिला आहे.

इंग्लंडचा काऊंटी क्पब लिसेस्टरशायर संघासोबतचा आपला करार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane ) याने सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या व्यस्त वेळापत्रक आणि देशांतर्गत क्रिकेटच्या आगामी हंगामासाठी रहाणेला हा निर्णय घ्यावा लागला. इंग्लंडची देशांतर्गत वनडे स्पर्धा ऑगस्ट महिन्यात सुरू होणार असून सप्टेंबरपर्यंत खेळली जाणार आहे. या रॉयल लंडन वनडे कपमध्ये 5 ऑगस्ट रोजी ब गटातील आपला पहिला सामना केंट संघाविरुद्ध खेळायचा आहे. पण या सामन्यात रहाणे भाग घेऊ शकणार नाही. कारण त्याने काही काळ विश्रांती घेण्याचा निर्मय गेतला. रहाणेने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून ही माहिती दिली.

रहाणेने लिहिले की, “मागच्या 4 महिन्यांमध्ये आम्ही खूप क्रिकेट खेळलो आहोत. त्यामुळेच आता आगामी देशांतर्गत हंगामासाठी पुन्हा तंदुरुस्त आणि रिचार्ज होण्याची वेळ आहे. मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी नेहमीच अभिमानाची बाब राहिली आहे. पुढचे दोन महिने मी आपल्या फिटनेसवर मेहनत घेणार आहे आणि ऑक्टोबर महिन्यात सुरू होणाऱ्या देशांतर्गत हंगामात सर्वोत्तम प्रदर्शनाचा प्रयत्न असले. याच कारणास्तव मी लिसेस्टरशायरसोबतआगामी काऊंटी हंगामात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. लिसेस्टरशायर संघासोबत मी नियमित संपर्कात आहे आणि बदलत्या परिस्थितीबाबत त्यांना संपूर्ण कल्पना आहे. भविष्यात हा करार मी पुन्हा नव्याने सुरू करेल, अशी आशा आहे.”

https://twitter.com/ajinkyarahane88/status/1686674458445000704?s=20

दरम्यान, अजिंक्य रहाणेने लिसेस्टरशायर संघासाठी आगमी वनडे कपमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतल्यामुळे संघातील त्याची गाजा खाली झाली होती. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू पीटर हॅड्सकॉम्ब याला रहाणेच्या जागी संघात घेतले गेले आहे. (Ajinkya Rahane decided to opt out of the planned county stint with Leicestershire )

महत्वाच्या बातम्या –
ऐकलंत का… हुकमी एक्का परततोय! विश्वचषकापूर्वी राहुलची विकेटकीपिंगला सुरुवात, व्हिडिओ पाहाच
WORLD CUP 2023 । भारत-पाक सामन्याविषयी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरचा सामना रद्द, शेड्यूल बदलले

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---