---Advertisement---

दुसऱ्या वनडे वॉटरबॉय, तर तिसऱ्या वनडेत अचानक फिल्डर बनला विराट, सामना पाहणाऱ्यांमध्ये झपाट्याने वाढ

Virat Kohli
---Advertisement---

भारतीय संघाने कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना पून्हा एकदा आराम देण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात विराट आणि रोहित या दोघांना विश्रांती दिली गेली. परंतु, प्लेइंग इलेव्हनचा भाग नसतानाही विराट तिसऱ्या सामन्यात भारतासाठी खेळताना दिसला.

वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसर्‍या वनडे सामन्यात भारतीय संघा रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या अनुपस्थितीत मैदानात उतरला. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णायबाबत चाहत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. पण तिसर्‍या वनडे सामन्यात विराट अचानक पर्यायी खेळाडू म्हणून क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला. तत्पूर्वी दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहली वॉटरबॉयच्या भूमिकेत दिसला होता. पण तिसऱ्या सामन्यात चाहत्यांना तो पुन्हा एकदा निळ्या जर्सीत दिसला. मैदानातील त्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

https://twitter.com/imVKohli___18/status/1686668010428510208?s=20

वेस्टइंडीजची टीम खेळत असतांना १८व्या षटकात विराट कोहलीची एक झलक चाहत्यांना पाहायला मिळाली. तो कुलदीप यादवच्या पहील्या ओवर मध्ये फील्डींग करतांना दिसला. सलग दूसऱ्या वनडेत प्लेंइंग इलेव्हनमध्ये नसतांना देखील तो मैदानावर अपली उपस्थिती दर्शवू शकला. असेही सांगितले जात आहे की, विराट मैदानात येताच लाईव्ह सामना पाहणाऱ्यांच्या संखेत झपाट्याने वाड झाली.

दुसऱ्या वनडे सामन्यात विराट खेळाडूंना पाणी पाजताना –

भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 351 धावा केल्या. प्रत्युत्तात 352 धावांचे लक्ष पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्टइंडीजची सुरूवात खराब झाली. विंडीजची वरची फळी मुकेश कुमारने ध्वस्त केल. मुकेश कुमारने आपल्या पहिल्या षटकात ब्रेंडन किंग याची शून्यावर विकेट घेतली. त्यानंतर काईल मेयर्स (4) आणि कर्णधार साई होप (5) यांची विकेट घेतली. जयदेव उनादकट याने केसी कार्टी (6) तर शार्दुल ठाकुर याने शिमरोन हेटमायर (4) आणि रोमारीया शेफर्ड (8) यांची तंबूत धाडले. यानंतर कुलदीप यादव याने एथनाजे आणि कारियाह याची विकेट घेतली. या विकेटनंतर वेस्टइंडीजला संघ मागे पडला. शेवटच्या दोन विकेट शार्दुल ठाकुरने घेतल्या. भारताने तिसऱ्या वनडेमध्ये २०० रनांनी विजय मिळविला.

महत्वाच्या बातम्या –
हार्दिकच्या 70 धावांच्या खेळीमागे विराटचा हात! मालिका विजयानंतर कर्णधाराने स्वतः केला खुलासा
WORLD CUP 2023 । भारत-पाक सामन्याविषयी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरचा सामना रद्द, शेड्यूल बदलले

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---