---Advertisement---

वर्ल्डकप सुपर लीग: दुसरी वनडे जिंकत इंग्लंड अव्वलस्थानी विराजमान, भारत टॉप-५ च्याही खाली

---Advertisement---

इंग्लंडचा भारत दौरा आता अंतिम चरणात आला आहे. भारत आणि इंग्लंड संघांनी कसोटी आणि टी२० मालिका पूर्ण केल्या असून उभय संघ वनडे मालिका खेळत आहेत. ही मालिका आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलच्या (आयसीसी) वर्ल्डकप सुपर लीगचा (world cup super league) भाग आहे. अशात या मालिकेतील प्रत्येक सामन्यातील जय-पराजयासह दोन्ही संघांच्या गुणांत बदल होणार आहेत.

शुक्रवार रोजी (२६ मार्च) वनडे मालिकेतील दुसरा सामना पुणे येथे खेळवला गेला. इंग्लंडने हा सामना ४३.३ षटकात ६ विकेट्स राखुन जिंकला. या विजयासह इंग्लंडने आयसीसीस वर्ल्डकप सुपर लीगमधील गुणतालिकेत अव्वलस्थानी उडी घेतली आहे.

आयसीसीने जुलै २०२० मध्ये वर्ल्डकप सुपर लीगची सुरुवात केली आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण १३ संघांना सहभागी करण्यात आले आहे. या लीग अंतर्गत प्रत्येक संघ ३ सामन्यांच्या ८ वनडे मालिका खेळणार आहे. अर्थात एका संघाला तब्बल २४ वनडे सामने खेळावे लागणार आहेत. त्यापैकी ४ मालिका घरच्या तर ४ मालिका बाहेरील मैदानावर होतील. यातील प्रत्येक सामना विजयासह संघाच्या खात्यात १० गुण जमा होतात.

या सामन्यापुर्वी इंग्लंड संघ रन रेट आणि ३० गुणांसह तिसऱ्या स्थानावर विराजमान होता. तर बांगलादेश दुसऱ्या (३० गुण) आणि ऑस्ट्रेलिया (४० गुण) पहिल्या स्थानावर होता.  परंतु दुसऱ्या वनडेत मोठ्या फरकाने भारतावर मात करत इंग्लंडने रन रेटच्या आधारावर ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे.

इंग्लंड ०.५३८ रनरेट पहिल्या स्थानावर आला आहे. ८ वनडे सामन्यातील ४ सामने जिंकत आणि ४ सामने पराभूत होत ४० गुणांसह त्यांनी हे स्थान पटकावले आहे. तर ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यांचा रन रेट ०.३४७ इतका आहे.

https://twitter.com/ICC/status/1375667905635909637?s=20

याव्यतिरिक्त न्यूझीलंड, अफगानिस्तान आणि बांगलादेश संघ टॉप-५ मध्ये आहेत. तर भारत अवघ्या १९ गुणांसह आठव्या स्थानावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मिडल ओवरमध्ये कमी धावा ते पावप्लेमध्ये विकेट्सची उणीव; वाचा दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची कारणे

इंग्लिश फलंदाजांनी चोप चोपलं, तरीही का दिली नाही हार्दिकच्या हाती बॉलिंग? कॅप्टन विराट म्हणतो…

दुसऱ्या वनडेत शतक झळकावल्यानंतर का पकडले कान? केएल राहुलने केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---