मुंबई । कोरोना संकटाच्या काळामध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी मालिकेत इंग्लंडने मंगळवारी वेस्ट इंडिजला मोठ्या फरकाने हरवले. इंग्लंडने तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. या विजयासह इंग्लंड क्रिकेट संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेमध्येही तिसरा क्रमांक मिळविला.
मालिकेत दोन सामने जिंकल्यानंतर इंग्लंडचे आता 226 गुण आहेत. भारत 360 गुणांसह अव्वल स्थानी आहे तर ऑस्ट्रेलिया 296 गुणांसह दुसर्या स्थानावर आहे. दुसरीकडे वेस्ट इंडीज 40 गुणांसह सातव्या स्थानावर आहे.
मालिका सुरू होण्यापूर्वी इंग्लंड 146 गुणांसह चौथ्या स्थानावर होता तर न्यूझीलंड 180 गुणांसह तिसर्या स्थानावर होता. पण आता क्रमवारीमध्ये मोठा फेरबदल झाला आहे.
इंग्लंडने यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची अॅशेस मालिका बरोबरीत सोडली होती, तर दक्षिण आफ्रिकेला चार सामन्यांच्या मालिकेत 3-1 ने हरवले होते. त्याचबरोबर भारताने वेस्ट इंडिजला त्यांच्या घरच्या मालिकेत 2-0 ने पराभूत केले होते.