भारतीय क्रिकेट संघ सप्टेंबर महिन्यात इंग्लंड (INDvsENG) दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी भारताने महिलांचा टी20 आणि वनडे संघ जाहीर केला आहे. या दोन्ही प्रकाराच्या क्रिकेट मालिकेत भारताचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे. तर या दौऱ्यात भारतीय संघाची सर्वात अनुभवी खेळाडू आणि वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी ही तिच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणार आहे. हा सामना 24 सप्टेंबरला लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाणार आहे.
झुलनची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) हिने 2002 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. मागील दोन दशकांपातून ती भारतीय संघासाठी खेळत आहे. तिने 201 वनडे सामन्यात 252 विकेट्स घेतल्या आहेत. महिला वनडेमध्ये ती 200 पेक्षा अधिक विकेट्स घेणारी एकमेव गोलंदाज आहे.
झुलनने 68 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत 56 आणि 12 कसोटी सामन्यांत 44 विकेट्स घेतल्या आहेत. ती वनडेमध्ये 1000 पेक्षा अधिक धावा आणि 200 पेक्षा अधिक विकेट्स घेणारी एकमेव खेळाडू आहे. तसेच क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये तिने एकूण 352 विकेट्स घेतल्या आहेत आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाजही तीच आहे.
विशेष म्हणजे, झुलनने तिचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना इंग्लंड विरुद्धच खेळला आहे. चेन्नईमध्ये झालेल्या त्या वनडे सामन्यात तिने 7 षटके टाकताना 15 धावा देत 2 विकेट्स घेतल्या होत्या. हा सामना भारताने 8 विकेट्सने जिंकला होता.
झुलनवर बॉलीवूडमध्ये ‘चकता एक्सप्रेस’ (Chakda Xpress) चित्रपट काढला आहे. तिच्या आयुष्यावर बनवला गेलेला हा चित्रपट २ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात झूलनचे छोटेसे गाव चकदा आणि त्या गावातून तिचा विश्वचषकापर्यंतचा प्रवास दाखवला गेला आहे.
भारताचा इंग्लंड दौरा
भारतीय संघाचा इंग्लंड दौरा 10 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यामध्ये 10, 13 आणि 15 सप्टेंबरला भारत इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका 18, 21 आणि 24 सप्टेंबरला खेळणार आहे. तर या दौऱ्यातील शेवटचा वनडे सामना लॉर्ड्सवर खेळला जाणार आहे. हा सामना झुलनचा कारकिर्दीतील शेवटचा सामना असणार आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ-
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्म्रीती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, एस मेघना, दीप्ति शर्मा, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), पूजा वस्त्राकार, स्नेह राणा, रेणुका ठाकुर, मेघना सिंह, राजेश्वरी गायकवाड़, हरलीन देओल, डी हेमलता, सिमरन दिल बहादुर, झूलन गोस्वामी और जेमिमा रोड्रिगेज.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तब्बल 18 वर्षाच्या अद्वितीय प्रवासानंतर आदित्य तरेचा मुंबईला ‘गुडबाय’; या संघाचे करणार नेतृत्व
भारताने केलेला पराभव पाकिस्तानच्या जिव्हारी! माजी कर्णधाराच्या ट्वीटमुळे क्रिकेटविश्वात नव्या वादाला सुरूवात
सलग दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला विजयाची गॅरंटी! हॉंगकॉंगही धक्का देण्यास तयार