---Advertisement---

‘या’ महिला क्रिकेटपटूच्या आयुष्यावर आधारित सिनेमाची झलक अनुष्काने केली शेअर, विराटची खास कमेंट पाहाच

On: मंगळवार, ऑगस्ट 30, 2022 3:26 PM
Anushka Sharma
---Advertisement---

बॉलिवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा सथ्या तिचा येणारा नवीन चित्रपट ‘चकदा एक्सप्रेस’मुळे चर्चेत आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी हिच्या आयुष्यावर आधारीत हा चित्रपट असणार आहे. अनुष्काने सोमवारी (30 ऑगस्ट) या चित्रपटाची एक छोटीशी झलक चाहत्यांसाठी शेअर केली आहे, ज्यावर भारताचा माजी कर्णधार आणि अनुष्काचा पती विराट कोहली याचीही कमेंट आली.

अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून या चित्रपटाची झलक चाहत्यांसाठी शेअर केला आहे. अनुष्काने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “आमचे दिग्दर्शक प्रोसित रॉय यांच्यासोबत ‘चकता एक्सप्रेस’ (Chakda Xpress) चित्रपटाची एक झलक.” अनुष्काच्या या इंस्टा पोस्टवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळाल्या आहेत. तिचा पती विराट कोहली ( Virat Kohli) यानेही या पोस्टवर हार्टची इमोची कमेंट केली आहे. झूलन गोस्वामी (Jhulan Goswami) हिच्या आयुष्यावर बनवला गेलेला हा चित्रपट २ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

झूलनच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट प्रोसित रॉय (Prosit Roy) यांनी दिग्दर्शित केला आहे. यापूर्वी त्यांनी ब्लडी माउस्टेच आणि परी अशा काही चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. अनुष्काने शेअर केलेल्या व्हिडिओत झूलन गोस्वामीचे छोटेसे गाव चकदा आणि त्या गावातून तिचा विश्वचषकापर्यंतचा प्रवास दाखवला गेला आहे. भारतीय दिग्गज महिला गोलंदाजाच्या अयुष्यातील बारकावे या चित्रपटातून चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाईल.

https://www.instagram.com/tv/Ch1wmetp6dT/?utm_source=ig_web_copy_link

झूलनच्या क्रिकेट कारकिर्दीचा विचार केला, तर ती अप्रतिम राहिली आहे. झूलनने ६ जानेवारी २००२ साली इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून भारतासाठी पदार्पण केले होते. एकदिवसीय क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये तिने एकूण 201 सामने खेळले आणि यामध्ये 252 विकेट्स घेतल्या आणि सोबतच 1228 धावाही केल्या. भारतासाठी खेळलेल्या १२ कसोटी सामन्यांमध्ये तिने ४४ विकेट्स घेतल्या आणि फलंदाजी करताना २९१ धावा केल्या. टी-२० फॉरमॅटमध्ये तिने ६८ सामने खेळले, ज्यामध्ये गोलंदाजीत ५६ विकेट्स, तर फलंदाजाच्या रूपात ४०५ धावांची नोंद तिच्या नावापुढे आहे.

दरम्यान, झूलन गोस्वामी मागच्या मोठ्या काळापासून भारतीय संघाला सेवा देत असली, तरी आता लवकरच क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. भारताच्या महिला संघाला १८ सप्टेंबरपासून इंग्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची एक मालिका खेळायची आहे. ही मालिका झूलनच्या कारकिर्दीतील शेवटची मालिका असेल. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये तिने एकूण ३५२ विकेट्स घेतल्या आहेत आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाजीही तीच आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

सेहवागने काढला बाप, अख्तरला चढला संताप! म्हणाला, ‘असं बोलला असता तर…’
रोहित अन् विराटने एकत्र घेतली श्रीलंकन चाहत्याची भेट! कारण ऐकून तुम्हालाही हेवा वाटेल
पाकिस्तानसाठी आनंदाची बातमी, शाहीन आफ्रिदी लवकरच करणार संघपुनरागमन!  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---