बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड क्रिकेट संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीत एकदाही मजल मारली नसेल, पण इंग्लिश संघाने रविवारी 8 डिसेंबर रोजी न्यूझीलंडविरुद्धची दुसरी कसोटी जिंकून एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या विजयासह इंग्लंड WTC च्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा संघ बनला आहे. त्यांनी या बाबतीत भारताला मागे टाकले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला रविवारी गुलाबी चेंडू कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते.
डब्ल्यूटीसीच्या इतिहासात इंग्लंडने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 64 पैकी 32 सामने जिंकले आहेत. या दरम्यान त्यांना 24 सामन्यांमध्ये पराभवाचा देखील सामना करावा लागला आहे. तर 8 सामने अनिर्णित राहिले आहेत.
भारताबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये एकूण 53 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये भारताने 31 जिंकले आहेत आणि 17 सामने गमावले आहेत. या दरम्यान भारताचे 5 सामने अनिर्णित राहिले.
इंग्लंड आणि भारत व्यतिरिक्त, आतापर्यंत कोणत्याही संघाला WTC मध्ये 30 किंवा त्याहून अधिक सामने जिंकता आलेले नाहीत. ऑस्ट्रेलिया या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे आणि त्यांच्या खात्यात 29 विजय आहेत. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका प्रत्येकी 18 विजयांसह त्यांच्या मागे आहेत.
WTC मध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ-
संघ विजय
इंग्लंड 32
भारत 31
ऑस्ट्रेलिया 29
न्यूझीलंड 18
दक्षिण आफ्रिका 18
पाकिस्तान 12
श्रीलंका 12
वेस्ट इंडिज 9
बांग्लादेश 5
दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात दुसरी कसोटी सुरू आहे. या सामन्यातही आफ्रिकन संघ पाहुण्यांचा पराभव करण्यात यशस्वी ठरला तर तो या यादीत न्यूझीलंडला मागे टाकेल. जर श्रीलंका जिंकला तर पाकिस्तानला नूकसान होईल.
हेही वाचा-
IND vs AUS: मोहम्मद सिराजच्या ‘त्या’ कृतीवर रोहित शर्माची साथ, म्हणाला “कर्णधार म्हणून पाठिंबा देणे….”
IND vs AUS: टीम इंडियाला आणखी एक धक्का, रोहित शर्माच्या या वक्तव्याने मोठी खळबळ
WTC 2025 फायनलच्या शर्यतीत हे चार संघ, जाणून घ्या भारतासह सर्व देशांचे समीकरण