इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्यानंतर सर्वांना भारताच्या इंग्लंड दौऱ्याचे वेध लागले आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध साउथम्पटन येथे जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळणार आहे. १८ ते २२ जून दरम्यान हा सामना होणार आहे. त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. तत्पुर्वी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज हॅरी गर्नी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे.
३४ वर्षीय गर्नीला गतवर्षी दुखापत झाली होती. अजूनही तो आपल्या दुखापतीतून पुर्णपणे सावरला नसल्याने त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपातून निवृत्ती जाहीर केली आहे.
तो म्हणाला की, “माझी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे. मी खांद्याच्या दुखापतीतून बरे होण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु यामुळे मी खूप दुखी आहे. कारण या दुखापतीमुळेच मला माझी क्रिकेट कारकिर्द संपवावी लागली आहे.”
“जेव्हा मी १० वर्षांचा होतो तेव्हा मी पहिल्यांदा हातात चेंडू घेतला होता. क्रिकेट मागील २४ वर्षे माझ्या जिवनाचा भाग राहिले आहे आणि माझ्यासाठी हा एक अप्रतिम प्रवास राहिला आहे. इंग्लंड संघाचे, आयपीएलमधील संघांचे, वाइटैलिटी ब्लास्ट, बिग बॅश लीग आणि सीपीएलसहित देश-विदेशात ८ ट्रॉफी जिंकण्याचे माझे स्वप्न मी पूर्ण केले आहे,” असे त्याने पुढे सांगितले.
https://twitter.com/cricbuzz/status/1393178556050546689?s=20
हॅरी गर्नीची क्रिकेट कारकिर्द
गर्नीच्या क्रिकेट कारकिर्दीविषयी बोलायचे झाले तर, त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्द जास्त मोठी राहिली नाही. परंतु त्याने देशांतर्गत क्रिकेट आणि इतर टी२० लीगमध्ये खूप क्रिकेट खेळले आहे. इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्त्व करताना त्याने १० वनडे सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ११ विकेट्स घेतल्या आहेत. तर २ टी२० सामने खेळताना ३ विकेट्सची कामगिरी केली आहे. २०१४ साली इंग्लंडविरुद्ध त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
टी२० स्पेशलिस्ट म्हटल्या जाणाऱ्या गर्नीने आयपीएल, बीबीएल, सीपीएल, पीएसएल अशा टी२० लीगमध्ये सहभाग घेतला आहे. तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता.
महत्त्वाच्या बातम्या-
मॅन विथ गोल्डन हार्ट! ‘धन्यवाद अण्णा, तू एक जीव वाचवलास’; मध्यरात्री पिडीताच्या मदतीला धावला विहारी
आयपीएल २०२१च्या उर्वरित हंगामावर टांगती तलवार? पाहा काय म्हणाले राजस्थान रॉयल्सचे संघमालक
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये ‘हे’ भारतीय खेळाडू ठरतील गेमचेंजर; दिग्गजाने वर्तवला अंदाज






