मेलबर्न| रविवारपासून (२६ डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) संघात ऍशेस मालिकेतील (Ashes Series) तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. हा सामना बॉक्सिंग डे कसोटी सामना आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होत असलेल्या या सामन्याच ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली. मात्र, इंग्लंडच्या नावावर सामन्यातील दुसऱ्याच डावात एक नकोसा विक्रम झाला आहे.
इंग्लंडच्या नावावर नकोसा विक्रम
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत इंग्लंडला फलंदाजीसाठी पाचारण केले. आपला हा निर्णय योग्य ठरवत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने डावाच्या दुसऱ्याच षटकात इंग्लंडचा सलामीवीर हसीब हमीदला यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरीकडे झेल देण्यास भाग पाडले.
त्यामुळे हसीब शुन्य धावेवर झेलबाद होत माघारी परतला. तो २०२१ वर्षात शुन्यावर बाद होणारा इंग्लंडचा ५० वा खेळाडू ठरला. म्हणजेच २०२१ वर्षात कसोटीमध्ये ५० वेळा इंग्लंडचे खेळाडू शुन्यावर बाद झाले आहेत. विशेष म्हणजे इंग्लंडच्या बाबतीत असे दुसऱ्यांदा झाले आहे की, एका वर्षात कसोटीमध्ये ५० किंवा त्यापेक्षा अधिकवेळा खेळाडू शुन्यावर बाद झालेत. यापूर्वी १९९८ साली इंग्लंडचे खेळाडू ५४ वेळा शुन्यावर बाद झाले होते.
इतकेच नाही तर, इंग्लंड असा एकमेव संघ आहे, ज्यांचे एका वर्षात ५० किंवा त्यापेक्षा अधिकवेळा खेळाडू शुन्यावर बाद झाले आहेत. (England register record 50 ducks in 2021 Tests)
अधिक वाचा – ‘बॉक्सिंग डे कसोटी’ म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या सर्वकाही
२०२१ वर्षाचा विचार करता, इंग्लंडपाठोपाठ भारतीय संघ आहे, ज्यांचे सर्वाधिकवेळा खेळाडू शुन्यावर बाद झाले आहेत. भारताचे ३४ वेळा खेळाडू २०२१ वर्षांत कसोटीमध्ये शुन्यावर बाद झालेत. त्यापाठोपाठ बांगलादेश, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे आहे. या तिन्ही संघांचे प्रत्येकी २३ खेळाडू २०२१ वर्षांत कसोटीमध्ये शुन्यावर बाद झाले आहेत.
व्हिडिओ पाहा – विरोधी संघातील गोलंदाजांना Golden Watches भेट देणारा Captain
इंग्लंडसाठी करो वा मरो स्थिती
इंग्लंडने ७२ व्या ऍशेस मालिकेतील पहिले २ सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे मेलबर्न येथे होत असलेला तिसरा सामना इंग्लंडसाठी करो वा मरो या स्थितीत आहेत. हा सामना जर इंग्लंड संघ पराभूत झाला, तर त्यांना ऍशस मालिका गमवावी लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
हार्दिक पंड्या पुन्हा बनणार बाप? पत्नी नताशाच्या ‘या’ फोटोंनी चर्चांना उधाण
दक्षिण आफ्रिकेत ‘रो’ ‘हिट’ होण्यासाठी सज्ज, पूर्ण केली फिटनेस चाचणी; खेळणार वनडे मालिका!