इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील तिसरी कसोटी केनिंग्टन ओव्हलवर खेळली जात आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने सामन्यावर आपली पकड घट्ट केली आहे. श्रीलंकेसमोर 219 धावांचे लक्ष्य आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेची धावसंख्या 1 गडी बाद 94 धावा आहे. अशाप्रकारे श्रीलंकेला आणखी 125 धावांची गरज आहे. सध्या कुसल मेंडिस आणि पथुम निशांक क्रीजवर आहेत. कुसल मेंडिस 25 चेंडूत 30 धावा करून खेळत आहे. तर पथुम निशांकने 44 चेंडूत 53 धावा केल्या.
कुसल मेंडिस आणि पथुम निशांक यांच्यात 48 चेंडूत 55 धावांची भागीदारी आहे. तत्पूर्वी, दिमुथ करुणारत्ने 21 चेंडूत 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. दिमुश करुणारत्नेला ख्रिस वोक्सने बाद केले. इंग्लंडने पहिल्या डावात 325 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तरात श्रीलंकेने 263 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला 62 धावांची आघाडी मिळाली. मात्र यानंतर श्रीलंकेने दमदार पुनरागमन केले. इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 156 धावांवर आटोपला. श्रीलंकेकडून दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना लहरु कुमराने सर्वाधिक 4 बळी घेतल्या. तर विश्वा फर्नांडो आणि असिथ फर्नांडो यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट्स मिळवल्या.
अशाप्रकारे श्रीलंकेसमोर 219 धावांचे लक्ष्य आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेची धावसंख्या 1 गडी बाद 94 धावा आहे. ही कसोटी जिंकून श्रीलंकेला आपला सन्मान वाचवायचा आहे. वास्तविक, पहिल्या कसोटीत इंग्लंडने श्रीलंकेचा 5 गडी राखून पराभव केला होता. यानंतर दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेला 190 धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. अशाप्रकारे इंग्लंड मालिकेत 2-0 ने पुढे आहे. पण तिसऱ्या कसोटीत श्रीलंकेने विजय मिळवला तर जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेवर परिणाम होऊ शकतो.
हेही वाचा-
केकेआरला आयपीएल चॅम्पियन बनवूनही भारतीय संघात स्थान नाही! श्रेयस अय्यरला वगळण्यामागचं कारण काय?
गौतम गंभीरनंतर कोण बनणार केकेआरचा मेंटॉर? 2 आयपीएल जिंकणाऱ्या दिग्गजाचं नाव आघाडीवर
‘अतिशय शक्तिशाली…’, राहुल द्रविडचे भारतीय क्रिकेटबाबत मोठे विधान