---Advertisement---

इंग्लंड की कुटाई हो गई! ‘या’ खेळाडूने केले मजेशीर ट्विट

On: बुधवार, फेब्रुवारी 17, 2021 8:15 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील चेन्नईच्या मैदानावरील दुसरा सामना मंगळवारी(१६ फेब्रुवारी) संपुष्टात आला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडच्या संघाविरुद्ध दणदणीत विजय मिळविला. ४८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव १६४ धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे या विजयासह भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी देखील साधली.

भारताच्या या विजयाने चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट आहे. त्याचप्रमाणे आजी-माजी खेळाडूही भारताच्या कामगिरीवर खुश आहेत. यात मनोज तिवारीचाही समावेश आहे.

ट्विट करत केले अभिनंदन
मनोज तिवारीने भारतीय संघाच्या विजयाचा क्षण टिपणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याने आपल्या घरून टिव्हीवर सामना पाहत असताना व्हिडिओ टिपला आहे. या व्हिडिओला त्याने ‘इंग्लंड की कुटाई हो गई’, असे जबरदस्त कॅप्शन देखील दिले आहे. विशेष म्हणजे सध्या ट्रेडिंग असलेला एक संवादही त्याने व्हिडिओत म्हटला आहे.

दरम्यान, सामन्याबाबत बोलायचे झाल्यास भारतीय संघाने तिन्ही आघाड्यांवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. फिरकीला अनुकूल असणार्‍या खेळपट्टीवर गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर भारतीय खेळाडूंनी आदर्श खेळाचा वस्तुपाठ सादर केला. रोहित शर्माचे दीडशतक, अक्षर पटेलचे पाच बळी आणि विराट कोहली-अजिंक्य रहाणे यांचे अर्धशतक भारताच्या विजयात महत्वपूर्ण ठरले.

मात्र, त्याहून जास्त चेन्नईचा लोकल बॉय असलेल्या आर अश्विनचे प्रदर्शन अधिक निर्णायक ठरले. अश्विनने पहिल्या डावात ५ तर दुसर्‍या डावात ३ बळी पटकाविले. तर दुसर्‍या डावात फलंदाजी करताना शानदार शतकही झळकवले. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीसाठी त्यालाच सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या –

Ind vs Eng : मर्यादित षटकांच्या मालिकेला भारताचा ‘हा’ प्रमुख खेळाडू मुकणार? जाणून घ्या कारण

पदार्पणाच्या कसोटीत एका डावात ५ विकेट्स घेणारा अक्षर पटेल नववा भारतीय; कोण आहेत अन्य ८ गोलंदाज, घ्या जाणून

“त्याला जाऊ देणे गरजेचे होते”, रूटने सांगितले मोईन अलीला मायदेशी पाठवण्यामागचे खरे कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---