मागील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे विजेतेपद बलाढ्य इंग्लंड संघाने जोस बटलर याच्या नेतृत्वाखाली जिंकले होते. आता या संघाने तब्बल चार महिन्यांनंतर आपल्या देशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासोबत विजयाचा जल्लोष केला आहे. इंग्लंड क्रिकेट संघ फक्त जल्लोष आणि जेवणाच्या आस्वादावरच थांबला नाही, तर खेळाडूंनी पंतप्रधानांच्या घरी 10 डाऊनिंग स्ट्रीट येथे क्रिकेटही खेळले. मजेशीर बाब अशी की, यादरम्यान सुनक यांनीही इंग्लंडच्या अव्वल गोलंदाजांचा सामना केला. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत सर्व खेळाडू फॉर्मल वेशभूषेत दिसत आहे. पंतप्रधान ऋषी सुनक (PM Rishi Sunak) हे स्वत:ही शर्ट-पँट आणि टाय परिधान करून फलंदाजी करताना दिसत आहेत. यादरम्यान ते वेगवान गोलंदाज सॅम करन (Sam Curran) आणि ख्रिस जॉर्डन (Chris Jordan) यांचा सामना करताना दिसत आहेत. काहीवेळा ते करनचा चेंडू मारण्यात चुकलेदेखील. मात्र, यावेळी त्यांनी काही चांगले शॉट्सही खेळले. तसेच, जॉर्डनने गोलंदाजी करताना सुनक यांची विकेटही घेतली. त्यानंतर त्याने जल्लोषही केला. फलंदाजीनंतर सुनक यांनी गोलंदाजीतही हात आजमावला.
Never in doubt ☝@CJordan nicks off the PM with a beauty after a working over from @CurranSM's left arm spin 🔥
Big send off as well 👀pic.twitter.com/JGTEwQiLx5
— Surrey Cricket (@surreycricket) March 23, 2023
कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) याने या भेटीचे काही फोटो त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. ही पोस्ट शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “काल काही खेळाडूंसोबत टी20 विश्वचषकाला 10 डाऊनिंग स्ट्रीटवर घेऊन जाणे सौभाग्याची बाब होती.”
https://www.instagram.com/p/CqICbkPsF4a/?utm_source=ig_web_copy_link
विशेष म्हणजे, टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा अंतिम सामना मेलबर्न येथे खेळला गेला होता. या सामन्यात इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघ आमने-सामने होते. अंतिम सामन्यात पाकिस्तानने इंग्लंड संघापुढे 138 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान इंग्लंडने 19 षटकात 5 विकेट्स पार केले आणि विश्वचषक आपल्या नावावर केला. (england team met british prime minister rishi sunak he faces sam curran and chris jordan bowling)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कानाखाली मारल्याचे विसरून श्रीसंत IPL 2023मध्ये हरभजनसोबत करणार ‘हे’ काम, मिळाली खास जबाबदारी
पहिलं प्रेम सोडून ‘तिने’ धरला क्रिकेटचा हात, WPL स्पर्धेत गुगलीने दिग्गज खेळाडूंना देतेय त्रास