प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा, ऍशेस मालिका (Ashes Series) याची येत्या ८ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत यंदा ५ कसोटी सामने खेळले जाणार आहेत. ही मालिका जिंकणारा संघ ऍशेस ट्रॉफीवरही आपले नाव कोरेल. परंतु यंदाची ऍशेस ऑस्ट्रेलियामध्ये होणार असल्याने पाहुण्या इंग्लंडच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. त्यातही इंग्लंडची ऑस्ट्रेलियामधील मागील कामगिरी त्यांच्यासाठी आणखीनच चिंतेची बाब ठरू शकते.
इंग्लंड संघाने ऑस्ट्रेलियामध्ये ११ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१०-११ मध्ये शेवटची कसोटी मालिका जिंकली होती. त्यावेळी उभय संघांमध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका झाली होती. ज्यामध्ये इंग्लंडने ३-१ अशी बाजी मारली होती. त्यानंतर इंग्लंडला ऑस्ट्रेलियामध्ये ऍशेज मालिका खेळताना विजय मिळवण्यात अपयश आले आहे.
२०१०-११ नंतर इंग्लंडचा संघ २०१३-१४ ऍशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियामध्ये गेला होता. त्यावेळी इंग्लंडला अतिशय लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. ऑस्ट्रेलियाने यावेळी ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडला ५-० असा व्हाईटवॉश दिला होता. त्यानंतर २०१७-१८ मध्ये इंग्लंडचा संघ ऍशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियामध्ये गेला होता. यावेळी ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील १ सामना अनिर्णित राखण्यात त्यांना यश आले होते. परंतु उर्वरित चारही सामने जिंकत ऑस्ट्रेलियाने ४-० ने ऍशेस ट्रॉफी पटकावली होती.
यानंतर आता पुन्हा ऍशेस मालिका २०२१ -२२ चे सर्व सामने ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहेत. त्यामुळे इंग्लंडचा संघ यंदाही ही मालिका गमावत ऑस्ट्रेलियामध्ये पराभवाची हॅट्रिक करतो की, हा नकोसा विक्रम मोडतो, यावर सर्वांचे लक्ष असणार आहे.
यजमान ऑस्ट्रेलिया या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी २ दिवसआधीच प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. इंग्लंडनेही सामन्याच्या एका दिवसापूर्वी १२ सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
इंग्लंडचा १२ सदस्यीय संघ: जो रूट (कर्णधार), स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), हसीब हमीद, जॅक लीच, डेविड मलान, ऑली पोप, ऑली रॉबिन, बेन स्टॉक्स, ख्रिस वोक्स, मार्क वुड.
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन: डेविड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लाबुशेन, स्टिव्ह स्मिथन, ट्रेविस हेड, कॅमरॉन ग्रीन, एलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नाथन लायन आणि जोश हेजलवुड.
महत्त्वाच्या बातम्या-
सौरव गांगुली-जय शाह जोडीने घेतला मोठा निर्णय, ‘या’ क्रिकेटपटूंना होणार फायदा
द्रविडने ‘या’ कारणामुळे दिला होता प्रशिक्षक बनण्यास नकार, पण गांगुली-शहाने काढला तोडगा
‘भिडेगा तो बढेगा’, प्रो कबड्डी लीगच्या प्रोमोचा सोशल मीडियावर धुमाकूळ, धोनीच्या अंदाजाची भरपूर चर्चा