---Advertisement---

विश्वचषक तर जिंकलाच, पण आता आयपीएलही जिंकायला निघाला इंग्लंडचा ‘हा’ पठ्ठ्या; म्हणाला, ‘मी आता…’

England-Cricket-Team
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा हंगाम जवळ आला आहे. नुकतीच टी20 विश्वचषक 2022 स्पर्धा पार पडली. यामध्ये इंग्लंड संघाने पाकिस्तानला अंतिम सामन्यात पराभूत करत विश्वचषकाचे विजेतेपदक पटकावले. आदिल रशीदने इंग्लंडच्या विजयात मोलाचे योगदान दिले. या स्पर्धेनंतर आदिल रशीद आयपीएल खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसते. त्याने आयपीएल खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रशीदने उपांत्य आणि अंतिम सामन्यात शानदार गोलंदाजी केली होती.

टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजय मिळवल्यानंतर आदिल रशीद (Adil Rashid) याने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रशीद म्हणाला की, “होय यावेळी मी आयपीएल ऑक्शनसाठी माझे नाव देणार आहे.” कोणत्या संघासोबत खेळणार याविषयीच्या प्रश्नावर रशीदने कोणतेही सकारात्मक उत्तर दिले नाही.

टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात रशीदने त्याच्या गोलंदाजीबद्दल म्हटले की, “मी चेंडू वेगान टाकतो. मात्र, या सामन्यात मी सावकाश चेंडू टाकत होतो. ही माझी योजना होती. मी त्यानुसारच खेळत होतो.” आपल्या संघाचा अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोन याच्याबद्दल बोलताना रशीद म्हणाला की, “तो हवेत वेगाने चेंडू फेकतो. हीच गोष्ट पाकिस्तानच्या शादाब खानवरही लागू होते. मी धिम्या गतीने चेंडू टाकण्याचा मार्ग वापरला.”

विशेष म्हणजे, ऑयन मॉर्गन (Eoin Morgan) याच्यानंतर जोस बटलर (Jos Buttler) याने संघाचे नेतृत्वपद स्वीकारले होते. बटलरच्या नेतृत्वातही संघाला काही ठिकाणी पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर संघाने पुन्हा एकदा एकजुटता दाखवत टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकला आणि दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक उंचावला. पाकिस्तान संघाने या स्पर्धेत सुरुवातीचे दोन सामने गमावले होते. मात्र, नंतर त्यांनी उपांत्य सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. तरीही पाकिस्तानची फलंदाजी महत्त्वाच्या सामन्यात गडगडली आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

आयपीएल 2023च्या लिलाव प्रक्रियेबद्दल बोलायचं झालं तर, पुढील महिन्यात म्हणजेच 23 डिसेंबर रोजी कोची येथे लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. (England this player wants to play ipl says i will put my name for ipl auction)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फायनलमध्ये पाकिस्तानची दाणादाण उडवणाऱ्या करनला पाँटिंगने म्हटले ‘बॉलर ऑफ द टूर्नामेंट’, पण का?
पाकिस्तानचे नागरिकत्व घेतलेल्या सॅमीने सांगितले टीम इंडियाच्या पराभवाचे कारण; म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---