पाकिस्तानची सलामी जोडी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. या जोडीने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग करताना मोठी भागीदारी केली आहे. या भागीदारीमुळेच पाकिस्तानने दुसऱ्या टी20 सामन्यात इंग्लंडला 10 विकेट्सने पराभूत केले आहे. यामुळे सात सामन्यांची ही टी20 मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे. या मालिकेतील तिसरा सामना शुक्रवारी (23 सप्टेंबर) कराचीमध्ये खेळला जाणार आहे.
नॅशनल स्टेडियम, कराची येथे खेळला गेलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट्स गमावत 199 धावसंख्या उभारली. त्यांच्याकडून मोईन अली याने सर्वाधिक नाबाद 55 धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानने 19.3 षटकातच 203 धावा करत विजय मिळवला. हा विजय मिळवताच पाकिस्तान संघ एकही विकेट न गमावता 200 पेक्षा अधिक धावा करणारा पहिला संघ ठरला आहे.
पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने 110 आणि मोहम्मद रिझवान याने 88 धावा केल्या. दोघांनी 117 चेंडूत 203 धावांची भागीदारी रचली. लक्ष्याचा पाठलाग करताना ही सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. हे करताना बाबर-रिझवान यांनी स्वत: चाच विक्रम मागे टाकला आहे. गोलंदाजीत पाकिस्तानकडून हॅरिस रउफ आणि शाहनवाज दहानी यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
बाबर-रिझवान यांनी पाकिस्तानकडून सर्वाधिक मोठी सलामी भागीदारी नोंदवली आहे. या दोघांनी 2021मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंचुरियनमध्ये पहिल्या विकेटसाठी 197 धावांची भागीदारी रचली होती. तसेच दोघांनी पाचव्यांदा 150 किंवा 150 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली आहे.
बाबरने शतक करताच तो त्याने आणखी एक विक्रम केला आहे. त्याचे हे कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरील 10वे शतक ठरले आहे, तर हे त्याचे 26वे आंतरराष्ट्रीय शतक आहे. बाबरने शतक करताच पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हकचा विक्रम मोडला.
WHAT A KNOCK!
Take a bow, Babar Azam 🙌#PAKvENG | 📝Scorecard: https://t.co/WHBPS7jrZE pic.twitter.com/H43zxy8rek
— ICC (@ICC) September 22, 2022
या मालिकेतील पहिला सामना 6 विकेट्सने जिंकत इंग्लंडने पाकिस्तानला धक्का दिला होता. मात्र आता पाकिस्तानने दुसरा सामना जिंकत मालिका बरोबरीत आणली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेव्हा १५ वर्षांपुर्वी टीम इंडियाच्या युवराजने केले होते ‘ऑस्ट्रेलिया’ संस्थान खालसा
वाढदिवस विशेष- माहित नसलेला अंबाती रायडू
आनंदाची बातमी! अखेर बुमराह उतरणार मैदानात; सूर्याने केले कन्फर्म