ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या २ संघांना जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट संघांमध्ये गणले जाते. शानदार फलंदाज आणि गोलंदाजांनी भरलेल्या या संघांमध्ये अनेकदा सामन्यादरम्यान कडी टक्कर पाहायला मिळाली आहे. कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर इंग्लंडमध्ये क्रिकेटचे पुनरागमन झाले. इंग्लंडने वेस्ट इंडिज, आयर्लंड आणि पाकिस्तान यांच्या विरुद्धच्या मालिकांचे यजमानपद भुषवले.
आता ऑस्ट्रेलिया संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची टी२० मालिका आणि ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे.
आजपासून (४ सप्टेंबर) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील ३ सामन्यांच्या टी२० मालिकेची सुरुवात होणार आहे. साउथम्पटन येथे हे सामना खेळले जाणार अजून, पहिल्या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सुरुवात रात्री १०.३० वाजता होईल. या सामन्याच्या तयारीसाठी ऑस्ट्रेलिया संघ जवळपास ११ दिवसांपुर्वी इंग्लंडला पोहोचला होता. England Vs Australia First T20 Match Starts Today
काही दिवसांपुर्वी इंग्लंडची पाकिस्तानविरुद्ध झालेल्या टी२० मालिका १-१च्या बरोबरीवर सुटली. पण, यामुळे यजमान इंग्लंड संघाला सराव करण्याची चांगली संधी मिळाली. संघात जोस बटलर, जोफ्रा आर्चर आणि मार्क वुड यांच्या पुनरागमनामुळे इंग्लंडचा टी२० संघ मजबूत झाला आहे. मात्र, अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आणि सलामीवीर फलंदाज जेसन रॉय या टी२० मालिकेत खेळताना दिसणार नाहीत.
स्टोक्स कॅन्सरने पिडीत आपल्या वडिलांची काळजी घेण्यासाठी न्यूझीलंडला आपल्या घरी गेला आहे. तर, रॉय दुखापतीमुळे या मालिकेत खेळणार नाही. त्याबरोबरच इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार जो रुट याला टी२० संघात स्थान मिळालेले नाही. पण, तो ११ सप्टेंबपासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेत इंग्लंड संघाचा भाग आहे.
तर ऑस्ट्रेलिया टी२० संघात ३ नव्या खेळाडूंची भर पडली आहे. डेनियल स्मॅस, रिले मेरेडिथ आणि जोश फिलीप अशी या खेळाडूंची नावे आहेत. तसेच, धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याने नऊ महिन्यांनंतर ऑस्ट्रेलिया टी२० संघात पुनरागमन केले आहे. अशाप्रकारे दोन्ही संघ पहिला टी२० सामना खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. रिकाम्या स्टेडियममध्ये जैव सुरक्षित वातावरणात हा सामना पार पडेल.
या टी२० मालिकेतील दूसरा सामना ६ सप्टेंबर तर तिसरा सामना ८ सप्टेंबर रोजी साउम्पटन येथे खेळण्यात येईल.
इंग्लंड टी२० संघ –
इयॉन मॉर्गन (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), जॉन बेयरस्टो, डेव्हिड मलान, सॅम बिलिंग्स, मोईन अली, सॅम करन, क्रिस जॉर्डन, आदिल रशिद, जोफ्रा आर्चर, मार्क वूड, टॉम बँटन, जो डेन्ली आणि टॉम करन.
ऑस्ट्रेलिया टी२० संघ –
ऍरॉन फिंच (कर्णधार), ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), डेविड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श, ऍश्टन ऍगर, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, केन रिचर्डसन, ऍडम झम्पा, मॅथ्यू वेड, जोश हेजलवूड. नॅथन लियॉन, सिन अबॉट, मार्कस स्टोनिस, अँन्ड्र्यू टाय, मार्नस लाब्यूशाने, डेनियल स्मॅस, रिले मेरेडिथ आणि जोश फिलीप.
महत्त्वाच्या बातम्या –
गावसकरांनी ४३८ धावांचे लक्ष्य जवळपास गाठून दिले होते पण….
पोलार्ड टी२०चा उत्तम खेळाडू, पण कसोटी क्रिकेट खेळण्यास योग्य नाही, पहा कोण म्हणलंय असं
रिकी पॉन्टिंगने ‘या’ दोन भारतीय क्रिकेटपटूंचे केले तोंडभरुन कौतुक; म्हणाला…
ट्रेंडिंग लेख –
पाकिस्तानी दिग्गजाला माकडउड्या मारायला लावणाऱ्या किरण मोरेंची गोष्ट
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट सामने खेळणारे २ भारतीय दिग्गज
ट्वेंटी२० क्रिकेटचे ३ दिग्गज खेळाडू ३, जे केकेआरसाठी ठरलेत सुपर फ्लॉप