---Advertisement---

रिकी पॉन्टिंगने ‘या’ दोन भारतीय क्रिकेटपटूंचे केले तोंडभरुन कौतुक; म्हणाला…

---Advertisement---

नवी दिल्ली| इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या २०२० च्या हंगामासाठी आता केवळ १५ दिवस राहिले आहेत. असे असताना सर्व संघ सराव आणि प्रशिक्षण सत्र पूर्ण करीत आहेत. अलीकडेच दिल्ली कॅपिटलचे प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांनी आर अश्विन आणि अजिंक्य रहाणे यांचे कौतुक केले आणि सांगितले की ते आपल्या कौशल्याने आणि अनुभवाने टीमला समृद्ध करतील. याव्यतिरिक्त, त्याने अश्विनला टी -20 लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फिरकीपटू मानले आहे.

अश्विनला महान असे संबोधले

पॉन्टिंगने हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, “अश्विन हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फिरकीपटू ठरला आहे. रहाणे आणि अश्विन दोघेही उच्च-दर्जाचे खेळाडू आहेत. रहाणेने बरेच काळ राजस्थानचे नेतृत्व केले. त्याच्याकडे सर्व प्रकारची कौशल्ये, दर्जा आणि अनुभव आहे, ज्याचा आमच्या संघाला फायदा होईल. तो पुढे म्हणाला टी -20 क्रिकेटमधील अनुभव किती महत्वाचा आहे हे आम्हाला सर्वांना माहित आहे आणि श्रेयसच्या रूपाने आम्हाला एक तरुण कर्णधार मिळाला आहे, परंतु मैदानावर अनुभवी खेळाडूंमुळे आम्हाला खूप मदत मिळेल.”

दिल्ली कॅपिटल्स मध्ये परत येऊन आनंद झाला.

पॉन्टिंगने सहा दिवसांची क्वारंटाईनची मुदत पूर्ण करून आणि कोविड-१९ ची चाचणी नेगेटिव्ह दिल्यानंतर १ सप्टेंबरला (मंगळवारी) कॅपिटल्सच्या प्रशिक्षणात सहभाग घेतला. आपल्या पहिल्या नेट सत्राबद्दल बोलताना, मुख्य प्रशिक्षक पॉन्टिंग म्हणाले की कॅपिटल्समध्ये परत येणे आनंदाची बाब आहे.

रणनीतीबद्दल विचारले असता, पॉन्टिंग म्हणाले की, प्रत्येक खेळाडू त्यांच्या पहिल्या सामन्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहू शकेल याची दक्षता घ्यावी लागल्याने पुढील तीन आठवड्यांमध्ये संघाने जास्ती प्रशिक्षण सत्रे ठेवलेली नाहीत.

ते म्हणाले, “खेळाडूंची वृत्ती सुरुवातीपासूनच आश्चर्यकारक होती आणि आज काही अपवाद नव्हता. खेळाडूंसाठी खूपच गरम आणि कोरडे वातावरण होते, यावेळी दिल्ली कॅपिटल्सच्या शिबिरापेक्षा चांगली जागा नाही.”

खेळाडू खेळायला उत्सुक आहेत

पॉन्टिंग पुढे म्हणाले, “आमच्याकडे एक छोटी टीम आहे त्यामुळे मला आमच्या प्रशिक्षण सत्राचे व्यवस्थापन मागील वर्षापेक्षा वेगळ्या पद्धतीने करायचे आहे. मी खेळाडूंना स्पष्ट केले आहे की पहिल्या तीन आठवड्यांत आम्ही जास्त प्रशिक्षण घेणार नाही. माझा विश्वास आहे की पहिल्या सामन्यासाठी आपली तयारी महत्वाची आहे. मला याची खात्री करायची आहे की शारीरिक, तांत्रिकदृष्टया खेळाडू पहिल्या सामन्यासाठी उत्सुक आहेत की नाही”

हा महान फलंदाज पुढे म्हणाला की, गेल्या वर्षी यशस्वी कामगिरीनंतर संघाने मिळवलेल्या यशाचा मी अभ्यास करीत आहे क्वालिफायर २ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून पराभूत झाल्याने दिल्ली कॅपिटलने आयपीएल २०१९ मध्ये तिसरे स्थान मिळविले. पॉन्टिंगने गेल्या हंगामातील खेळाडूंमध्ये सकारात्मक राहण्याचा आग्रह धरला कारण यामुळे संघाभोवती सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होण्यास मदत होईल.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल २०२०: सर्व संघांना दिले गेले ब्लूटूथ सक्षम बॅज; सर्व डेटा जाणार बीसीसीआयकडे

आयसीसी टी-२० क्रमवारी: डेव्हिड मलान पहिल्या ५ मध्ये परतला, हाफिजलाही झाला फायदा

सुशांत सिंग केसमध्ये समोर आले विराट कोहली-रोहित शर्मा कनेक्शन

ट्रेंडिंग लेख-

-आयपीएल २०२० मध्ये पदार्पण करु शकतात हे ५ परदेशी खेळाडू; एकाने तर ठोकलेत एका षटकात ५ षटकार

-आयपीएल २०२०: यंदा हे ३ संघ असतील सर्वात कमजोर; धोनीच्या सीएसकेचाही समावेश!

-आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा ५० पेक्षा अधिक धावा करणारे ५ फलंदाज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---