---Advertisement---

आंतरराष्ट्रीय पदार्पणात गांगुली, द्रविडची विकेट घेणाऱ्या अंपायरचा लीड्स सामन्यातून कसोटीत ‘डेब्यू’ 

On: गुरूवार, ऑगस्ट 26, 2021 2:21 PM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत संघांमध्ये बुधवारपासून (२५ ऑगस्ट) हेडिंग्ले स्टेडियम, लीड्स येथे तिसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी पूर्णपणे इंग्लंडचा दबदबा राहिला. भारताच्या ७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने पहिल्या दिवसाखेर बिनबाद १२० धावा केल्या आहेत. या सामन्यातून ऍलेक्स व्हार्फ यांनी मैदानी पंचाच्या रुपात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू व्हार्फ यापूर्वी १ वनडे आणि ३ टी२० सामन्यांमध्ये टिव्ही पंच राहिले आहेत. त्यांनी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यादरम्यान चौथ्या अधिकाऱ्याची भूमिका पार पाडली होती.

माजी अष्टपैलू व्हार्फ यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर केवळ वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी सप्टेंबर २००४ मध्ये भारताविरुद्ध वनडेद्वारे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. या सामन्यात ते सामनावीर पुरस्काराचे मानकरीही ठरले होते. या सामन्यात त्यांनी सौरव गांगुली, व्हिव्हिएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांच्यासारख्या दिग्गजांना बाद केले होते. भारताने हा सामना ७ विकेट्सने जिंकला होता.

इंग्लंडकडून त्यांनी १३ वनडे सामने खेळताना १८ विकेट्स घेतल्या होत्या. २४ धावांवर ४ विकेट्स ही त्यांची वनडेतील सर्वोत्तम कामगिरी राहिली होती.

दरम्यान तिसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारतासाठी निराशादायी राहिला. नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजी निवडली. परंतु हा निर्णय प्रतिस्पर्धी इंग्लंडच्या पथ्यावर पडला. जेम्स अंडरसन, क्रेग ओव्हरटनच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय फलंदाजांना २० धावांचा आकडाही गाठता आला नाही. परिणामी भारतीय संघ ७८ धावांवर सर्वबाद झाला.

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने पहिल्या दिवसाखेर ४२ धावांची आघाडी घेतली आहे. सलामीवीर रॉरी बर्न्स (५२ धावा) आणि हसीब हमीद (६० धावा) मैदानावर टिकून आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

‘टेस्ट स्पेशलिस्ट’ पुजाराच्या फलंदाजीला गंज, माजी क्रिकेटरने दिला ‘हा’ बहुमुल्य सल्ला

इंग्लंडला डिवचणे भारताला भोवले; दिग्गज म्हणाले, ‘कोहलीने आपला अहंकार खिशात ठेवावा’

लीड्स कसोटीत फलंदाजी करतेवेळी पंतकडून झाली ‘ही’ चूक, पंचांनी वेळीच दिला इशारा 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---