---Advertisement---

तिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स

---Advertisement---

नॉटिंगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव 161 धावातच कोलमडला. यामुळे भारताने पहिल्या डावात 168 धावांची आघाडी घेतली आहे.

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने भारताकडून या डावात सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. कसोटीमध्ये पहिल्यांदाच हार्दिकने एका डावात पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

इंग्लंडने पहिल्या डावाची चांगली सुरुवात केली होती. सलामीवीर अॅलिस्टर कूक(29) आणि केटन जेनिंग्ज(20) यांनी 54 धावांची सलामी भागिदारी रचली होती. परंतू हे दोघेही पाठोपाठ बाद झाल्यावर अन्य फलंदाजांनीही नियमित कालांतराने आपल्या विकेट गमावल्या.

फक्त जॉस बटलरने शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून एकाकी लढत दिली. मात्र त्याला अन्य फलंदाजांची साथ मिळाली नाही. अखेर त्याला जसप्रीत बुमराहने बाद करत इंग्लंडचा पहिला डाव 38.2 षटकात संपुष्टात आणला.

बटलरने 32 चेंडूत 39 धावांची खेळी केली. त्याने यात 3 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याचबरोबर त्याने कसोटीत त्याच्या 1000 धावाही पूर्ण केल्या.

इंग्लंडच्या बाकी फलंदाजांपैकी कर्णधार जो रुट(16), आॅली पोप(10), जॉनी बेअरस्टो(15), बेन स्टोक्स(10), ख्रिस वोक्स(8), आदिल रशीद(5) आणि जेम्स अँडरसन(1) यांनी धावा केल्या. तर स्टुअर्ट ब्रॉड शुन्य धावेवर बाद झाला.

भारताकडून हार्दिक पंड्याने 28 धावात सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर इशांत शर्मा(2/32), जसप्रीत बुमराह(2/37) आणि मोहम्मद शमी(1/56) यांनी विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी भारताने पहिल्या डावात सर्वबाद 329 धावा केल्या आहेत.

संक्षिप्त धावफलक:

भारत पहिला डाव- सर्वबाद 329 धावा

इंग्लंड पहिला डाव – सर्वबाद 161 धावा

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

आॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

तिसरी कसोटी: भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३२९ धावा

म्हणून टीम इंडियाने हाताला बांधली काळी पट्टी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment